'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कार, म्हणाला- "स्वामींच्या आशीर्वादाने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:27 IST2024-11-04T16:25:52+5:302024-11-04T16:27:11+5:30

दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक कलाकारांनी गाडी आणि सोनं खरेदीला पसंती दर्शवली. 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्यानेदेखील नुकतीच नवी कोरी कार घरी आणली आहे.

tuzyat jeev rangla fame actor amol naik buys new car tata on diwali shared post | 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कार, म्हणाला- "स्वामींच्या आशीर्वादाने..."

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कार, म्हणाला- "स्वामींच्या आशीर्वादाने..."

दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक कलाकारांनी गाडी आणि सोनं खरेदीला पसंती दर्शवली. 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्यानेदेखील नुकतीच नवी कोरी कार घरी आणली आहे. इतर सेलिब्रिटींप्रमाणेच अभिनेता अमोल नाईक यानेदेखील दिवाळीचा मुहुर्त गाठला आहे. दिवाळीत अमोलने महागडी कार खरेदी केली आहे. 

अमोलने टाटा कंपनीची गाडी खरेदी केली आहे. गाडीचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने गाडी घेतल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. नवी गाडी घेतल्यानंतर अमोलने पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने चाहत्यांचेही आभार मानले आहेत. 

श्री स्वामी समर्थ ♥️

 

स्वामींच्या आशीर्वादाने पाडव्याचा मुहूर्त साधून नाईक परिवारा मध्ये हे नविन member join झाले.त्यांच माझ्याकडून आणि तुम्हा सर्वानकडून मी मनापासून स्वागत करतो.....🎊🎉❤️😍🧿💫

बाकी तुमच्या सर्वानचा आशिर्वाद, प्रेम माझ्यावर आता आहे त्या पेक्षा जास्त वाढतचं राहूदे....❤️😍🧿👑💫


अमोल नाईकने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये त्याने बरकत ही भूमिका साकारली होती. 'सुंदरी' या मालिकेतही तो झळकला आहे. सध्या अमोल स्टार प्लसवरील 'माती से बंधी डोर' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: tuzyat jeev rangla fame actor amol naik buys new car tata on diwali shared post