'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर बाथरोबमध्ये थिरकल्या वहिनीसाहेब, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:13 IST2025-06-11T14:12:47+5:302025-06-11T14:13:13+5:30

Dhanashree Kadgaonkar : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेबांच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर हिनेदेखील 'एक नंबर, तुझी कंबर' या गाण्यावर डान्स केला आहे अन् तोही बाथरोबमध्ये.

Tuzyat Jeev Rangala Fame Vahini Saheb Aka Dhanashree Kadgaonkar shared video on Ek Number Tuzi Kambar Song, which goes viral | 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर बाथरोबमध्ये थिरकल्या वहिनीसाहेब, व्हिडीओ होतोय व्हायरल

'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर बाथरोबमध्ये थिरकल्या वहिनीसाहेब, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर गुलाबी साडी फेम गायक संजू राठोड(Sanju Rathod) च्या 'एक नंबर, तुझी कंबर' (Ek Number Tuzi Kambar) या नवीन गाण्याने धुमाकूळ घातला आहे. या गाण्याने फक्त नेटकऱ्यांनाच नाही तर सेलिब्रेटींना भुरळ घातली आहे. तेदेखील या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान आता 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangla) मालिकेत वहिनीसाहेबांच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaonkar) हिनेदेखील 'एक नंबर, तुझी कंबर' या गाण्यावर डान्स केला आहे अन् तोही बाथरोबमध्ये. तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने इंस्टाग्रामवर 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती स्विमिंग पूलजवळ बाथरोबमध्ये थिरकताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या व्हिडीओवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटींनीही कमेंट केल्या आहेत. पूर्वा शिंदेने कमेंटमध्ये उफ्फ असं लिहिलं आहे.


वर्कफ्रंट
धनश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने २०१० साली 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. त्यानंतर तिने कलर्स मराठीवर 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेबांच्या भूमिकेतून धनश्रीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. शेवटची ती तू चाल पुढं मालिकेत शिल्पीच्या भूमिकेत दिसली होती. तिची ही भूमिका निगेटिव्ह होती.
 

Web Title: Tuzyat Jeev Rangala Fame Vahini Saheb Aka Dhanashree Kadgaonkar shared video on Ek Number Tuzi Kambar Song, which goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.