VIDEO :  ठेवाल ना मला सुखात? अमृता पवारने लग्नमंडपात घेतला उखाणा, नीलरावांची रिअ‍ॅक्शन तर बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 11:16 IST2022-07-08T11:00:35+5:302022-07-08T11:16:12+5:30

Amruta Pawar Wedding :होय, लग्नमंडपात अमृताने नवरोबासाठी खास उखाणा घेतला, त्याचा हा व्हिडीओ आहे. ‘ ठेवाल ना मला सुखात?’, असा प्रश्न या उखाण्याद्वारे अमृताने नीलरावांना विचारला आहे.

Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hav fame Amruta Pawar wedding ukhana video viral | VIDEO :  ठेवाल ना मला सुखात? अमृता पवारने लग्नमंडपात घेतला उखाणा, नीलरावांची रिअ‍ॅक्शन तर बघा...

VIDEO :  ठेवाल ना मला सुखात? अमृता पवारने लग्नमंडपात घेतला उखाणा, नीलरावांची रिअ‍ॅक्शन तर बघा...

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’  (Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hav) मालिकेत अदितीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता पवार ( Amruta Pawar )नुकतीच लग्नबेडीत अडकली. नील पाटील  याच्यासोबत अमृताने लग्नगाठ बांधली. गेल्या बुधवारी हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. यापैकी एक व्हिडीओ खास आहे. होय, लग्नमंडपात अमृताने नवरोबासाठी खास उखाणा घेतला, त्याचा हा व्हिडीओ आहे. ‘ ठेवाल ना मला सुखात?’, असा प्रश्न या उखाण्याद्वारे अमृताने नीलरावांना विचारला आहे.

अमृता एक उत्तम अभिनेत्री आहे. शांत स्वभावाची सुस्वभावी अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. पण लग्नात थोडी मस्ती मज्जा, मस्करी तर चालतेच. लग्नमंडपात अमृताने असा काही उखाणा घेतला की नीलराव सुद्धा क्लिनबोल्ड झालेत. तिने  पतीला मजेशीर प्रश्न विचारला आहे. याचा व्हिडीओ अमृताने शेअर केला आहे. यात अमृता मजेशीर उखाणा घेतेय आणि तिचा उखाणा ऐकून नीलराव गोड हसताना दिसत आहेत.

‘पाटलांच्या घरात प्रवेश करुन करणार नवीन संसाराची सुरुवात, नील रावांचं नाव घेते ठेवाल ना मला सुखात?’असा गोड उखाणा अमृताने घेतला आणि तिच्या या गोड उखाण्यानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. अमृता आणि नील दोघेही या उखाण्याच्या कार्यक्रमानंतर एकमेकांकडे बघून गोड हसताना दिसले. अमृताच्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तिच्या युनिक उखाण्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे.अमृताला सगळ्यांकडून लग्नाच्या शुभेच्छा येत आहेत.  

गेल्या 4 एप्रिल रोजी अमृता व नीलचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता.  तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अमृताचा पती नील पाटील याचा कलाविश्वाशी काहीही संबंध नसून तो इंजिनिअर आहे.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेव्यतिरिक्त अमृताने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.  अमृता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए अंतर्गत लेखापाल म्हणून काम करत होती. यानंतर तिनं अभिनेत्री म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘दुहेरी’ या मराठी मालिकेतून केली.   

Web Title: Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hav fame Amruta Pawar wedding ukhana video viral