पिया अलबेलासाठी तुषार खन्नाने बनवले एठ पॅक अॅब्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 14:56 IST2017-04-05T09:26:09+5:302017-04-05T14:56:09+5:30
पिया अलबेला या मालिकेत तुषार खन्ना मयांकची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. तुषार ...

पिया अलबेलासाठी तुषार खन्नाने बनवले एठ पॅक अॅब्स
प या अलबेला या मालिकेत तुषार खन्ना मयांकची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. तुषार सध्या त्याच्या या भूमिकेवर खूप मेहनत घेत आहे. या मालिकेत चांगल्यातला चांगला अभिनय करता यावा यासाठी तो अभिनयाचे धडे गिरवत आहे. पण त्यासोबत तो पिळदार शरीरदेखील बनवत आहे. तुषार अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी त्याचे वजन खूपच जास्त होते. पण त्याने योग्य डाएट आणि व्यायाम करून त्याचे वजन कित्येक किलो कमी केले आहे. त्याने गेल्या काही महिन्यात त्याचे नऊ किलो वजन कमी केले आहे. याविषयी तुषार सांगतो, "या मालिकेसाठी सुरज बडजात्या यांनी माझी निवड केल्यानंतर या मालिकेसाठी मला साइन करण्यात आले. त्यावेळी माझे वजन खूपच जास्त होते. मला या भूमिकेसाठी बारीक होणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे ही मालिका स्वीकारल्यापासून मी सतत डाएट करत आहे आणि योग्य व्यायामदेखील करत आहे. या मालिकेतील भूमिकेनुसार एका खेळाडूप्रमाणे माझा लूक असणे गरजेचे असल्याने मी त्याप्रमाणे माझे शरीर बनवले आहे. मी सगळेच जेवण एकत्र न जेवता दिवसातील सहा वेळा हळहळू करून जेवतो. आता तर व्यायाम करणे ही माझी सवयच बनली आहे. मला चित्रीकरणाच्या व्यग्र शेड्युलमुळे व्यायाम करणे शक्य होत नाही. पण तरीही मी दिवसातील काही तास तरी व्यायाम करून एठ पॅक अॅब्स बनवले आहेत. एकदा शरीर पिळदार बनल्यानंतर ते मेन्टेन करणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे मी सध्या त्यावर खूप मेहनत घेत आहे."