गर्ल्स हॉस्टेल मालिकेला मिळणार एक वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 15:15 IST2017-09-14T09:45:03+5:302017-09-14T15:15:03+5:30
जेव्हा एखाद्या अनाकलनीय गूढ गोष्टीमुळे मनात धोक्याची जाणीव होते, तेव्हा अनुभवास येणारी ती भावना, आपल्या मनात एक विचित्र प्रकारचे ...
.jpg)
गर्ल्स हॉस्टेल मालिकेला मिळणार एक वळण
ज व्हा एखाद्या अनाकलनीय गूढ गोष्टीमुळे मनात धोक्याची जाणीव होते, तेव्हा अनुभवास येणारी ती भावना, आपल्या मनात एक विचित्र प्रकारचे भय निर्माण करते. तसे पाहाल तर हे भय बऱ्याच वेळा प्रसंगानुरूपही असते, त्यामुळे ते कोणत्या गोष्टीचे वाटेल हे काही सांगता येत नाही. झी युवावरील 'गर्ल्स हॉस्टेल' ही मालिका अशाच प्रकारची भयाची भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेत पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आलेल्या नऊ मुलींची आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या भयावह घटनेची गोष्ट पाहायला मिळत आहे. या मुलींच्या आयुष्यात एक अशी घटना ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते.
‘गर्ल्स हॉस्टेल’ मध्ये आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांनी मालिकेची उत्कंठा वाढवलेली आहे. या मालिकेत सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी, सागरिका, नेहा आणि वनिता या पुणे, नाशिक, पंढरपूर, मराठवाडा अशा आणि इतर वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या आहेत. या मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये रूममेट्स असून खूप धमाल मस्ती करतात. कधीकधी त्यांच्यामध्ये लुटुपुटीची भांडणं देखील होतात. पण त्या नेहमीच मजेत राहत होत्या. पण मालिकेच्या पहिल्याच भागात सर्वांच्या लाडक्या साराचा अनपेक्षितरित्या मृत्यू झाला आणि हॉस्टेलमध्ये अनेक भीतीदायक घटना घडू लागल्या. आतापर्यंत हॉस्टेलमधील मुलींसोबत घडणाऱ्या गूढ घटनांची संख्या वाढतच आहे आणि आता अंगावर शहरे आणणाऱ्या, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अकल्पित घटनाची शृंखला अधिकाधिक अनुभवायला मिळणार आहे. सर्वपित्री अमावस्या निमित्त दाखवण्यात येणाऱ्या महाएपिसोडपासून मालिका एक वेगळेच वळण घेणार आहे. भास आभासाच्या पलीकडे असणारी अकल्पित शक्ती आपलं अस्तिव ठळकपणे दाखवणार आहे. यामुळे भयाची एक वेगळीच अनुभूती आता प्रेक्षकांना महाएपिसोडपासून मालिकेत पाहायला मिळणार आहे.
Also Read : अश्विनी मुकादम झळकणार गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत