Tunisha Sharma: तुनिषाला घेऊन तिघंही रुग्णालयात पोहचले, शिझानही होता; शेवटचा तो व्हिडिओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 19:20 IST2022-12-27T19:17:09+5:302022-12-27T19:20:13+5:30
Tunisha Sharma: तुनिषाला रुग्णालयात दाखल केल्याचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे.

Tunisha Sharma: तुनिषाला घेऊन तिघंही रुग्णालयात पोहचले, शिझानही होता; शेवटचा तो व्हिडिओ आला समोर
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर हैराण करणारे खुलासे होतायेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करतायेत. अभिनेत्रीच्या आईनं तुनिषाचा सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना या प्रकरणाचा अधिक तपास यावा यासाठी शिझान खानला ४ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान शिजानने तुनिषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. भिन्न धर्म आणि वयातील अंतरामुळे ब्रेकअप केल्याचे पोलिस कोठडीत शिझान खानने सांगितले आहे. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर मला खूप त्रास झाला आणि त्यामुळेच त्याने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांने सांगितले. मात्र याचदरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे.
तुनिषाला रुग्णालयात दाखल केल्याचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये दोन लोकांनी तुनिषाला उचलले आहे आणि या दोन लोकांच्या मागे शिझान देखील असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे तिघेही पांढऱ्या रंगाच्या कारमधून खाली उतरताना आणि घाईघाईत तुनिषाला पायऱ्यांवरून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत.
तुनिषा शर्माच्या टॅटूने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष; पोस्ट होतेय व्हायरल, पण काय लिहिलं होतं?, पाहा
दरम्यान, चौकशीदरम्यान शिझानने तुनिषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. भिन्न धर्म आणि वयातील अंतरामुळे ब्रेकअप केल्याचे पोलिस कोठडीत शिझान खानने सांगितले आहे. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर मला खूप त्रास झाला आणि त्यामुळेच त्याने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांने सांगितले. मात्र तुनिषाच्या मैत्रिणीने शिझानवर धक्कादायक आरोप केले आहेत.
तुनिषाची मैत्रीण रय्या लबीब हिने तुनिषा आणि शिझानच्या नात्याबाबत अनेक दावे केले आहेत. शिझानवर गंभीर आरोप करत रय्या म्हणाले, 'तिला (तुनिषा) नैराश्याने ग्रासले होते आणि तिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. तिला याबद्दल बोलायचे नव्हते. शिझानने अनेक मुलींना प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर केला. तो त्या सर्व मुलींची फसवणूक करत होता. त्याचे पडद्यावरचे रूप पाहून मुली प्रभावित व्हायच्या आणि त्याच्याशी मैत्री करायला तयार व्हायच्या, असा दावा रय्या लबीब हिने केला आहे.
रय्या पुढे म्हणाली की, 'शिझानने तिच्यासोबत फक्त सेक्ससाठी रिलेशनशिप ठेवली होती. त्याला लग्न किंवा प्रेमात रस नव्हता. तुनिषा शिझानपासून गरोदर राहिली असण्याची शक्यता आहे. मृत्यूवेळी ती गरोदर नव्हती, पण याआधी गरोदर राहिली असण्याची शक्यता असून आणि गोळ्या खाऊन गर्भपात केला असावा. मला निश्चितपणे माहित नाही, पण ती एका गोष्टीबद्दल खूप तणावात होती, असं रय्या लबीब हिने सांगितले. रय्या लबीबच्या दाव्यांमुळे शिझानच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"