'तुमची मुलगी काय करते?' उत्कंठावर्धक वळणावर, खरा किलवर जगासमोर येणार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 15:39 IST2023-01-10T15:39:01+5:302023-01-10T15:39:33+5:30
'तुमची मुलगी काय करते?'. चित्तथरारक अशा या मालिकेत अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळत आहेत. किलवरचा शोध घेताघेता ती रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.

'तुमची मुलगी काय करते?' उत्कंठावर्धक वळणावर, खरा किलवर जगासमोर येणार!!
सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या धाटणीची अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते?'. चित्तथरारक अशा या मालिकेत अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळत आहेत. किलवरचा शोध घेताघेता ती रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.
आता भोसले किलवरचा थरारक शोध घेणार आहे आणि खरा किलवर जगासमोर येणार आहे. यासोबतच आजवर मालिकेत निरनिराळे रंजक भाग पाहायला मिळाले. मालिकेतली उत्कंठा कायम राखत गुप्तता पाळण्यात टीम यशस्वी ठरली. त्यामुळेच मालिकेतली रंजकता कायम राहिली. आता मालिका शेवटापर्यंत येऊन पोहचली आहे आणि हा थरारक आठवडा पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे. भोसले किलवरला कशा प्रकारे पकडेल, हे आपल्याला पाहायला मिळेल.
या मालिकेचे बंगाली भाषेत डबिंग झाले आहे. प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडली आहे. 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट ठरणार आहे. 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेची लोकप्रियता यातूनच आपल्याला समजते आहे. 'तुमची मुलगी काय करते?' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली असून या आठवड्यात ती शिगेला आहे १५ जानेवारी रोजी रविवारी १० वाजता महाएपिसोड पाहायला मिळणार आहे.