'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत दणक्यात पार पडणार अक्षरा आणि अधिपतीची हळदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 16:32 IST2023-09-27T11:15:35+5:302023-09-27T16:32:00+5:30
दोघांच्या नात्याला नवीन वळण येणार असून ह्या हळदीच्या सोहळ्यात नक्की काय घडेल व अजून काही जबरदस्त ट्विस्ट येईल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत दणक्यात पार पडणार अक्षरा आणि अधिपतीची हळदी
झी मराठी वरील "तुला शिकवीन चांगलाच धडा" ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. भुवनेश्वरी, अधिपती आणि अक्षरा ही पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतायत. लवकरच मालिकेत अक्षरा आणि अधिपती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. साखरपुड्यानंतर आता त्यांच्या लग्नाची लगबग मालिकेत सुरु झाली आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेत मागच्या काही दिवसांत खूप ट्विस्ट येऊन गेले आणि प्रेक्षकांना ही ते खूप मनोरंजक वाटत आहे. आता पर्यंतच्या भागात आपण पहिले व्याही जेवणाचा कार्यक्रम होतो सगळे जण खूप खुश आहेत. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरी अक्षरावर कुठल्या गोष्टीचा दबाव टाकून लग्नासाठी तयार करत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. २८ आणि २९ सप्टेंबरच्या भागात आपण अक्षराच्या मेहेंदीचा कार्यक्रम पाहणार असून अक्षरा आणि अधिपतीची हळदही जोरदार धमाक्यात साजरी होणार आहे. दोघांच्या नात्याला नवीन वळण येणार असून ह्या हळदीच्या सोहळ्यात नक्की काय घडेल व अजून काही जबरदस्त ट्विस्ट येईल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.
अक्षरा आणि अधिपतीच्या मेहेंदी आणि हळदीचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा विवाह पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अक्षरा आणि अधिपतीचा लग्नसोहळा खूपच खास असणार आहे. अक्षया आणि अधिपतीच्या लग्नात काय ट्वीस्ट येणार हे आपल्याला लवकरच कळेल.