पाठकबाईंच्या नशिबात म्हणे लग्नाचा योगच नाही...! विश्वास बसत नसेल तर पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 10:27 IST2022-02-23T10:24:35+5:302022-02-23T10:27:12+5:30

Akshaya Deodhar Video : ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपून बरेच दिवस झाले असले तरी आजही अभिनेत्री अक्षया देवधरला पाठकबाई म्हणूनच लोक ओळखतात. सध्या ही अक्षया एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

tujhyat jeev rangala fame pathak bai aka akshaya deodhar will not getting married share funny video | पाठकबाईंच्या नशिबात म्हणे लग्नाचा योगच नाही...! विश्वास बसत नसेल तर पाहा हा व्हिडीओ

पाठकबाईंच्या नशिबात म्हणे लग्नाचा योगच नाही...! विश्वास बसत नसेल तर पाहा हा व्हिडीओ

अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ही पाठक बाई म्हणून घराघरात प्रसिद्ध झाली होती.‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzhat Jeev Rangala) या मालिकेतून तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले. अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकलीत. त्यामुळे मालिका संपून बरेच दिवस झाले असले तरी आजही तिला पाठकबाई म्हणूनच लोक ओळखतात. सध्या ही अक्षया एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, अक्षयाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलीये. होय, पाठकबाईंच्या नशिबात म्हणे लग्नाचा योगचं नाही. आता हे आम्ही नाही तर खुद्द पाठक बाईंनी एक व्हिडीओ शेअर करत सांगितलंय. 

तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ चांगलाच मजेशीर आहे. इन्स्टाग्रामवर टाईमपास सुरू असताना अक्षयाला एक फिल्टर मिळाला. तुमचं लग्न कधी होणार? याचं उत्तर हा फिल्टर देतो. अक्षयालाही हा फिल्टर वापरण्याचा मोह अनावर झाला. तिनेही तो फिल्टर ट्राय केला आणि त्याने तुमचं लग्न कधीच होणार नाही, असं उत्तर तिला मिळालं. फिल्टरने दिलेलं हे उत्तर बघून अक्षयाला हसावं की रडावं तेच कळेना. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. यावर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत.
अक्षया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ती अनेक व्हिडीओ व ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे.

चाहत्यांनी दिल्या मजेदार कमेंट्स
अक्षयाच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. ‘अरे त्या फिल्टरला वेड लागलंय. मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला’, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. एकाने यावर तिला ग्रह शांती करण्याचा सल्ला दिला आहे. ‘हे काही खरं नाही, एखादा बकरा मिळेलंच’, अशी कमेंट एका युजरने केली. ‘चालतंय की’, अशा शब्दांत एका युजरने अक्षयाला धीर दिला आहे. ‘काळजी करू नकोस, मी लग्नासाठी तयार आहे’, असं एका युजरने तिच्या या व्हिडीओवर लिहिलं आहे.

Web Title: tujhyat jeev rangala fame pathak bai aka akshaya deodhar will not getting married share funny video