हार्दिक जोशीने कोल्हापूरात सुरू केली 'राणादा फूड्स'ची नवीन शाखा, म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 03:21 PM2024-03-08T15:21:14+5:302024-03-08T15:29:25+5:30

हार्दिक जोशीने कोल्हापूरमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.

Tujhyat Jeev Rangala Fame Hardeek Joshi Will Start New Outlet In Kolhapur | हार्दिक जोशीने कोल्हापूरात सुरू केली 'राणादा फूड्स'ची नवीन शाखा, म्हणाला…

हार्दिक जोशीने कोल्हापूरात सुरू केली 'राणादा फूड्स'ची नवीन शाखा, म्हणाला…

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. या मालिकेत त्याने साकारलेला राणादा प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यानंतर हार्दिकने अनेक भूमिका साकारलेल्या असल्या तरी आजही त्याला राणादा असं म्हणूंनच अनेक जण ओळखतात. आता याच नावानं त्यानं एक व्यवसाय सुरू केला आहे.  

हार्दिक जोशीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो म्हणताना, "नमस्कार मंडळी…कोल्हापुरातील राजारामपुरी येथे माऊलीच्या पुतळ्याजवळ राणादा फूड्सचं नवीन आऊटलेट आम्ही सुरू करणार आहोत. याठिकाणी खवय्यांना बदाम थंडाई, मिसळ आणि शेगावची सुप्रसिद्ध कचोरी या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल. तर नक्की या!"  त्याच्या या नवीन व्यवसायाला चाहत्यांकडून तूफान प्रतिसाद मिळाला. 

गेल्या काही महिन्यांत मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपले स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर, सुप्रिया पाठारे, निरंजन कुलकर्णी, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहरे अशा मराठी मनोरंजन विश्वातील असंख्य कलाकारांनी गेल्या काही दिवसांमध्ये अभिनय क्षेत्र सांभाळून स्वत:चे नवे व्यवसाय सुरू केले आहेत. 

 हार्दिकने तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर अनेक मालिका केल्या आहेत. सध्या तो स्टार प्रवाह वहिनीवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच त्याने काही चित्रपटांतदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.  शिवाय तो झी मराठी वाहिनीवरील जाऊ बाई गावात या शोमध्ये काम करताना पाहायला मिळालं होतं. 

Web Title: Tujhyat Jeev Rangala Fame Hardeek Joshi Will Start New Outlet In Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.