'तुझ्या रूपाचं चांदनं' आणि 'आई – मायेचं कवच' या मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 19:45 IST2021-12-24T19:45:09+5:302021-12-24T19:45:32+5:30
'आई- मायेचं कवच' (Aai Mayecha Kavach) मालिकेत आई आणि लेकीचा प्रवास पाहायला मिळणार आहे. तर 'तुझ्या रूपाचं चांदनं' (Tuzya Rupacha Chandana) मध्ये नक्षत्राची कथा रेखाटण्यात आली आहे.

'तुझ्या रूपाचं चांदनं' आणि 'आई – मायेचं कवच' या मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
कलर्स मराठीवर आई- मायेचं कवच आणि 'तुझ्या रूपाचं चांदनं' ही मालिका लवकरच भेटीला य़ेत आहे. या दोन्ही मालिका २७ डिसेंबरपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आई- मायेचं कवच मालिकेत आई आणि लेकीचा प्रवास पाहायला मिळणार आहे. तर 'तुझ्या रूपाचं चांदनं'मध्ये नक्षत्राची कथा रेखाटण्यात आली आहे.
आई- मायेचं कवच मालिकेत एका स्वाभिमानी, शिस्तप्रिय आईचा आणि तिच्या मुलीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या कथेला झालर आहे एका गूढ रहस्याची... असं काय घडतं आई मुलीच्या आयुष्यात ज्यामुळे त्या दोघींचे संपूर्ण आयुष्यं बदलून जाते हे बघण रंजक असणार आहे. आई – मायेचं कवच ही मालिका २७ डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री १०.००वाजता प्रसारीत होणार आहे.
सौंदर्य आणि तिरस्कार यामध्ये प्रेमाची लागणार कसोटी
तर, दुसरीकडे सौंदर्य आणि तिरस्कार यामध्ये प्रेमाची कसोटी लागणार आहे. प्रत्येक मुलीला वाटतं असतं आपण सुंदर दिसावं. सुंदर असणं वा तसं जन्माला येणं हे काही कोणाच्या हातात नसतं ते भाग्यात असतं. पण सौंदर्यचं जर अभिशाप असेल तर ? जर सुंदर दिसणंचं पाप असेल तर ? याच आणि अश्याच अनेक प्रश्नांमधून जातं आहे आपली नक्षत्रा. नक्षत्राची आई तिला लहानपणापासून सांगत आली आहे गरीबाघरी सौंदर्य हे शाप असतं आणि म्हणूनचं तिची आई नक्षत्राचं सुंदर रूप समाजापासून लपवून ठेवतं आहे. पण काय होईल जेव्हा सुंदर रूपाचा तिरस्कार करणारा दत्ता नक्षत्राला भेटेल ? दत्ताच्या तिरस्कारला नक्षत्रा प्रेमात बदलू शकेल? नक्षत्रा तिचं खरं रूप काही कारणांमुळे लपवत आहे तो या सत्यापासून अनभिज्ञ आहे. तिरस्कार आणि सत्याच्या दुधारी तलवारीवर कसा रंगणार नक्षत्रा आणि दत्तच्या प्रेमकहाणीचा करार ? प्रेमाची परिभाषा बदलायला येत आहे नक्षत्रा. तुझ्या रूपाचं चांदनं – गरीबाघरी सौंदर्य हे शाप आहे का ? ही मालिका २७ डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.