तू चाल पुढं: अश्विनी घेणार मयुरीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन; मायलेकींमध्ये पडणार वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 20:09 IST2023-05-23T20:08:18+5:302023-05-23T20:09:49+5:30

Tu Chala pudha: एकीकडे अश्विनी तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे मयुरी प्रतिकच्या प्रेमात पडली आहे.

Tu Chala pudha Ashwini takes admission in Mayuri's college | तू चाल पुढं: अश्विनी घेणार मयुरीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन; मायलेकींमध्ये पडणार वादाची ठिणगी

तू चाल पुढं: अश्विनी घेणार मयुरीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन; मायलेकींमध्ये पडणार वादाची ठिणगी

छोट्या पडद्यावर तू चाल पुढं या मालिकेला अल्पावधीत प्रेक्षकांनी आपलंसं केलं. त्यामुळे ही मालिका कमी कालावधीत चांगलीच लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेत अश्विनीच्या कॅरेक्टरमध्ये बराच बदल झाल्याचं दिसून येत आहे. कधीकाळी केवळ चूल आणि मूल सांभाळणारी अश्विनी तिच्या पायावर भक्कम उभी राहिली आहे. त्यामुळे तिचे निर्णय ती स्वत: घेऊ लागली आहे. यामध्येच आता ती मयुरीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार आहे.

एकीकडे अश्विनी तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे मयुरी प्रतिकच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे अश्विनीने आपल्याच कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली तर आपलं आणि प्रतिकचं नात तिला कळेल ही भीती मयुरीच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अश्विनीचं कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणं मयुरीला फारसं पटलेलं नाही.

दरम्यान, अश्विनीला अचानकपणे कॉलेजमध्ये पाहून मयुरी थबकते आणि तू इकडे काय करतेस असा प्रश्न विचारते. त्यावर कॉलेजच्या प्रिन्सिपल मयुरीला अश्विनीने आपल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्याचं सांगतात. त्यावर मयुरी संतापते. परंतु, मुख्यध्यापकांसमोर ती काहीही बोलत नाही. मात्र, तिच्या चेहऱ्यावर राग पूर्णपणे दिसून येतो. म्हणूनच, आता या मालिकेत मयुरी आणि अश्विनी यांच्या नात्यात पहिल्यांदाच चढउतार येणार असल्याचं दिसून येतं. 
 

Web Title: Tu Chala pudha Ashwini takes admission in Mayuri's college