बिझी शेड्युलमध्येही शिल्पी देतीये फिटनेसकडे लक्ष; हेवी वर्कआऊटचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:44 PM2023-03-03T16:44:56+5:302023-03-03T16:45:59+5:30

Dhanashree kadgaokar : धावपळीच्या आयुष्यातही ती तिच्या फिटनेसकडे खास लक्ष देत असल्याचं या व्हिडीओमधून दिसून येत आहे.

tu chal pudhe fame actress dhanashri kadgaonkar share her workout video on social media | बिझी शेड्युलमध्येही शिल्पी देतीये फिटनेसकडे लक्ष; हेवी वर्कआऊटचा व्हिडीओ व्हायरल

बिझी शेड्युलमध्येही शिल्पी देतीये फिटनेसकडे लक्ष; हेवी वर्कआऊटचा व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

झी मराठीवरील 'तू चाल पुढं'  (tu chal pudhe) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत येणारी वळणं आणि चढउतार यामुळे ती दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. इतकंच नाही तर या मालिकेमध्ये अभिनेत्री धनश्री काडगांवकरने (dhanashri kadgaonkar) नकारात्मक भूमिका साकारुनही लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा आहे.

धनश्री कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती सेटवरचे, तिच्या कुटुंबासमवेतचे वा वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिचा असाच एक वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये धनश्री हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे धावपळीच्या आयुष्यातही ती तिच्या फिटनेसकडे खास लक्ष देत असल्याचं या व्हिडीओमधून दिसून येत आहे. धनश्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे.

दरम्यान, धनश्री मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तू चाल पुढं या मालिकेत ती शिल्पी ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. तसंच तुझ्यात जीव रंगला या मालिकेत तिने साकारलेल्या वहिनीसाहेब या भूमिकेलाही प्रेक्षकांनी तितकीच पसंती दिली होती. 
 

Web Title: tu chal pudhe fame actress dhanashri kadgaonkar share her workout video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.