Deepa Parab Chaudhari : "विलक्षण समाधान मिळत...", ‘तू चाल पुढं’ मालिकेतील अश्विनी उर्फ दिपाची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 07:00 IST2022-11-26T07:00:00+5:302022-11-26T07:00:02+5:30

‘तू चाल पुढं’ या मालिकेतून अंकुश चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री दीपा परबनं बऱ्याच वर्षानंतर कमबॅक केलं आहे. दरम्यान तिची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

Tu chal pudha serial Fame Deepa Parab Chaudhari's post viral | Deepa Parab Chaudhari : "विलक्षण समाधान मिळत...", ‘तू चाल पुढं’ मालिकेतील अश्विनी उर्फ दिपाची ती पोस्ट चर्चेत

Deepa Parab Chaudhari : "विलक्षण समाधान मिळत...", ‘तू चाल पुढं’ मालिकेतील अश्विनी उर्फ दिपाची ती पोस्ट चर्चेत

‘तू चाल पुढं’ या मालिकेतून अभिनेत्री म्हणजे दीपा परब-चौधरी (Deepa Parab Chaudhari)ने मराठी.  दीपा बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दिसतेय आहे. ‘तू चाल पुढं’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यात दीपा साकारत असलेली  अश्विनीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडली. तू चाल पुढं मालिकेतील दीपा परबची भूमिका सगळ्या गृहिणींना जवळची वाटेल अशीच आहे. एखादी गृहिणी संसारासोबत स्वतःची स्वप्ने सुद्धा पूर्ण करू शकते, असं या मालिकेचं कथानक आहे. दरम्यान अंकुश चौधरीची पत्नी दीपाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते. 

 ‘तू चाल पुढं’ मालिकेत एक नवं वळण आहे. मालिकेत अश्विनीच्या (दीपा) नवऱ्याच्या हाती काम नसल्याने ती स्वतःच काम शोधण्यासाठी फिरत आहे. 

दिपाची पोस्ट
अश्विनीच्या स्वप्नांची नवी सुरुवात होत असतानाच तू चाल पुढं मालिकेच्या आऊट डोअर शूटींग दरम्यान ज्यांनी खऱ्या आयुष्यात स्वतःची खानावळ उघडण्याच स्वप्न उराशी बाळगून ती उत्तमरीत्या चालवत असणाऱ्या गौरवी गुरुप्रसाद मलबारी ताईंना भेटण्याची संधी मिळाली. अश्विनीची भूमिका साकारत असताना अशा प्रकारे वास्तविक आयुष्य जगणाऱ्या अश्विनीला बघून आपण करत असलेल्या कामाची कौतुकाची थाप पाठीवर पडते आणि त्याचं विलक्षण समाधान मिळत.

झी मराठी ने तू चाल पुढं मालिकेद्वारे अश्विनी साकारण्याची संधी आणि इतके गोड अनुभव मला दिले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. दीपाने खानावळ चालवत असलेल्या अश्विनी यांच्याबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.
 

Web Title: Tu chal pudha serial Fame Deepa Parab Chaudhari's post viral