सत्‍य उघडकीस आले: पापोन स्‍वत:च स्‍वत:चे केस कापतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 17:30 IST2018-01-08T12:00:08+5:302018-01-08T17:30:08+5:30

एका सामान्‍य आसामी मुलापासून गायन क्षेत्रात आपले नावलौकिक केलेल्‍या अंगारग (पापोन) महंताने देशातील सर्वोत्‍तम गायक म्‍हणून आपले नाव प्रस्‍थापित ...

The truth came to light: Papon himself cut his hair! | सत्‍य उघडकीस आले: पापोन स्‍वत:च स्‍वत:चे केस कापतो!

सत्‍य उघडकीस आले: पापोन स्‍वत:च स्‍वत:चे केस कापतो!

ा सामान्‍य आसामी मुलापासून गायन क्षेत्रात आपले नावलौकिक केलेल्‍या अंगारग (पापोन) महंताने देशातील सर्वोत्‍तम गायक म्‍हणून आपले नाव प्रस्‍थापित केले आहे.नुकतेच &TV वरील गायन रिअॅलिटी शो 'द वॉईस इंडिया किड्स'च्‍या सेटवर आसामी लोककला-फ्यूजनचा उभारता स्‍टार पापोनने गायकीबरोबरच त्‍याच्‍यामधील लुप्‍त कौशल्‍याबाबतचे गुपित उघड केले. 'द वॉईस इंडिया किड्स'चा आगामी एपिसोड 'कोच की कसोटी' प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करणार आहे.या एपिसोडमध्‍ये परीक्षक स्‍पर्धकांना ते निपुण असलेल्‍या गोष्‍टींव्‍यतिरिक्‍त इतर गोष्‍टींमधील त्‍यांचे कौशल्‍य दाखवण्‍याचे आव्‍हान देणार आहेत.पण यासोबतच स्‍पर्धक देखील त्‍यांच्‍या परीक्षकांना आव्‍हान देणार आहेत.सेटवरील एका सुत्राने सांगितले की पापोनच्‍या टीममधील सर्व स्‍पर्धकांनी त्‍याला ६० सेकंदांमध्‍ये श्रुतीच्‍या केसांची वेणी घालण्‍याचे आव्‍हान दिले.अनेकांना वाटले की त्‍याच्‍यासाठी हे मोठे आव्‍हान आहे.पण पापोनने दिलेल्‍या वेळेतच सुरेखरित्‍या श्रुतीच्‍या लांब सुंदर केसांच्‍या वेण्‍या घातल्‍या आणि संपूर्ण टीमला आश्चर्यचकीत केले. याबाबत विचारले असता पापोन म्‍हणाला,''मी सुरुवातीला लांब केस ठेवायचो.गेल्‍या २० वर्षांपासून मी स्‍वत:च माझे केस कापतो.मला हेअरकट करायचा असल्‍यास मी सलूनमध्‍ये जात नाही.'' या सर्वोत्‍तम गायकामधील लपलेले हे गुपित ऐकून इतर परीक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. 

Also Read:'द वॉईस इंडिया किड्स'मध्‍ये सलमान खानने दिले ऑडिशन!

सलमान खानचे ऑडिशन पेन्टिंग असो किंवा फिटनेस असो किंवा अगदी नुकतेच गायन असो सलमान खान त्‍याचा छंद जोपण्‍यासाठी ओळखला जातो.त्‍याने गायलेली 'मैं हू हिरो तेरा बेबी को बेस पसंद है' आणि 'जुम्‍मे की रात है'ही गाणी अत्‍यंत लोकप्रिय ठरली आहेत.पण असे ऐकण्‍यात आले आहे की नुकतेच सलमानने 'द वॉईस इंडिया किड्स'च्‍या मंचावर ऑडिशन दिले.सर्व कलाकारांनी या मौजमजेने परिपूर्ण अशा क्षणाचा आनंद घेतला.मुलांनी देखील सलमानने कतरिनासह मंचावर धमाल केली.परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना सलमानने अगदी स्‍पर्धकाप्रमाणे उत्‍तरे दिली.सलमान खान कतरिना कैफसह नुकताच या शोच्या सेटवर आला होता.'टायगर जिंदा है' सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो आला होता. चित्रपटाच्‍या प्रमोशनसाठी या म्‍युझिक रिअॅलिटी शो 'द वॉईस इंडिया किड्स' च्‍या सेटवर हजेरी लावत बच्चेकंपनीसह खूप धमाल केल्याचेही पाहायला मिळाले. 

Web Title: The truth came to light: Papon himself cut his hair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.