टीआरपीचा खेळ अवघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 17:25 IST2016-09-09T11:55:23+5:302016-09-09T17:25:23+5:30
पंकज धीर गेली तीन दशके छोट्या पडद्यावर काम करत आहे. पंकजने महाभारत या मालिकेत साकारलेला करण आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ...
.jpg)
टीआरपीचा खेळ अवघड
प कज धीर गेली तीन दशके छोट्या पडद्यावर काम करत आहे. पंकजने महाभारत या मालिकेत साकारलेला करण आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. पंकज सध्या रिश्तो का सौदागर बाजीगर या मालिकेत काम करत आहे. पंकज इतकी वर्षं छोट्या पडद्याचा भाग असला तरी टीआरपीचा खेळ काय असतो हे मला अद्याप कळलेले नाही असे त्याचे म्हणणे आहे. पंकज सांगतो, "टीआरपी म्हणजे काय असते हे मला कळत नाही. त्यामुळे स्वतःचे काम चांगल्या पद्धतीने करायचे ही एकच गोष्ट मी सातत्याने करतो. माझे काम चांगले आहे की नाही हे लोकांनी ठरवू दे आणि लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना त्यांच्या कथेविषयी निर्णय घेऊ दे. मी केवळ माझे कामच करणार."