पलट ! बॅकलेस फोटो पाहून चाहत्यांचा उडाला गोंधळ, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 12:55 IST2021-10-30T12:52:47+5:302021-10-30T12:55:39+5:30

बिग बॉस ओटीटी मध्ये सहभागी झाल्यानंतर तिनं स्वतःची चांगलीच प्रसिद्धी करुन घेतली. घराबाहेर पडल्यानंतरही वेगवेगळे स्टंट करत ती चर्चेत असते.  

Trending Urfi Javed bare backless Attire amaze viewers | पलट ! बॅकलेस फोटो पाहून चाहत्यांचा उडाला गोंधळ, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

पलट ! बॅकलेस फोटो पाहून चाहत्यांचा उडाला गोंधळ, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे ती म्हणजे उर्फी जावेद. कधीही कुणी न ऐकलेलं नाव... फारसं चर्चेत नसलेलं नाव...मात्र बिग बॉस ओटीटी मध्ये सहभागी झाल्यानंतर तिनं स्वतःची चांगलीच प्रसिद्धी करुन घेतली. घराबाहेर पडल्यानंतरही वेगवेगळे स्टंट करत ती चर्चेत असते.  तिची चर्चा जास्त होते ती फक्त ती बोल्ड लूकमुळेच. हटके बोल्ड ड्रेसिंग करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतेय. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ती एकही संधी सोडत नाही. उर्फी वाहवा मिळवण्यापेक्षा अनेकदा ट्रोलच जास्त होत असल्याचे पाहायला मिळते. तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकदा नेटीझन्सना खटकते. 

 

नेटीझन्स तिच्या लूकवर संताप व्यक्त करताना दिसतात. उर्फी पुन्हा एकदा सोशल मीडिावर तिच्या नवीन व्हिडीओने धुमाकुळ घालत असल्याचे पाहायला मिळतंय. यावेळी बॅकलेस व्हिडीओ शेअर करत तिने पुन्हा एकदा पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. बॅकलेस अंदाज पाहून चाहते गोंधळातही पडल्याचे पाहायला मिळतंय. पाठमोरा अंदाज पाहिल्यानंतर लगेचच तिचा चेहरा समोर दिसतो. सध्या तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

आता उर्फी जावेदच्या अशा प्रकारच्या स्टंटबाजीनं थोडी चर्चा होते खरी..यातून तिच्याकडे बॉलीवुड किंवा एखादी संधी चालून येते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. बिग बॉस ओटीटीमधून प्रकाशझोतात आलेली उर्फी जावेद यापूर्वी ती 'चंद्र नंदिनी',' मेरी दुर्गा', बेपनाह', 'जीजी मां और डायन' या मालिकांमध्ये झळकली आहे.

Web Title: Trending Urfi Javed bare backless Attire amaze viewers