'वडिलांसमोर जायची भीती वाटायची'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 08:53 IST2023-07-13T08:52:36+5:302023-07-13T08:53:05+5:30

Aradhana sharma: मॉडेलिंगच्या दिवसात तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.

tmkoc tarak mehta fame aradhana sharma share casting couch terrible experience | 'वडिलांसमोर जायची भीती वाटायची'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव

'वडिलांसमोर जायची भीती वाटायची'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव

कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. यात काही अभिनेत्रींनी उघडपणे याविषयी भाष्य सुद्धा केलं. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अभिनेत्री चर्चेत येत आहेत. या मालिकेतील काही प्रसिद्ध अभिनेत्रींनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. यामध्येच आता या मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीत तिला आलेल्या अनुभवावर भाष्य केलं आहे.

'तारक मेहता' या मालिकेत दिप्ती ही भूमिका साकारुन लोकप्रिय झालेली अभिनेत्री आराधना शर्मा हिची एक जुनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवावर भाष्य केलं. आराधनाने तारक मेहतामध्ये दिप्ती नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारली होती. "मॉडेलिंगच्या दिवसात मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. त्या प्रकारानंतर मी इतकी घाबरले होते की वडिलांसमोर जायचीही मला भीती वाटायची. कास्टिंग एजंटपैकी एक जण माझ्याशी अतिशय उद्धटपणे वागला होता. त्याच्या बोलण्यामुळे मी प्रचंड खचून गेले होते", असं आराधना म्हणाली.

पुढे ती म्हणाली, "तो व्यक्ती त्या काळात भूमिकेसाठी कास्ट करत होता. त्यामुळे मी त्याला भेटायला गेले होते. मी एका खोलीत बसून स्क्रिप्ट वाचत होते. यावेळी तो वारंवार मला स्पर्श करायचा प्रयत्न करत होता. हा नेमका काय प्रकार आहे मला समजत नव्हता. या गोष्टीमुळे मी खूप घाबरले आणि तेथून उठून बाहेर पळाले." दरम्यान, घडलेल्या या प्रकारानंतर मी अनेक दिवस कोणाशी याविषयावर काहीच बोलू शकत नव्हते, असंही तिने सांगितलं. आराधनाने तारक मेहता व्यतिरिक्त स्प्लिट्सविला १२ आणि अन्य काही मालिकांमध्ये काम केलं आहे.
 

Web Title: tmkoc tarak mehta fame aradhana sharma share casting couch terrible experience