'तारक मेहता..' फेम शैलेश लोढा यांच्या वडिलांचं दीर्घ आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:30 IST2024-08-29T18:28:14+5:302024-08-29T18:30:05+5:30

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील मेहता साबच्या वडिलांचं दुःखद निधन

tmkoc actor shailesh loadha father shyam singh lodha passed away | 'तारक मेहता..' फेम शैलेश लोढा यांच्या वडिलांचं दीर्घ आजाराने निधन

'तारक मेहता..' फेम शैलेश लोढा यांच्या वडिलांचं दीर्घ आजाराने निधन

'तारक मेहता का उलटा चष्मा' मधील 'तारक मेहता' या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते शैलेश लोढा (shailesh lodha) यांचे वडिल श्याम सिंग लोढा (shyam singh lodha) यांचं दुःखद निधन झालंय. जोधपूरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम सिंग हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.  श्याम सिंग लोढा हे सामाजिक कार्यातील लोकप्रिय नाव होतं. शैलेश लोढा यांना कविता लिहिण्याची प्रेरणा त्यांच्या वडिलांकडून घेतली होती. 


वडिलांच्या निधनाची दुःखद वार्ता शैलेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितली. वडिलांसोबतचा भावुक फोटो पोस्ट करुन शैलेश लिहितात की, 'मी जो कोणी आहे फक्त तुमची सावली आहे. आज सकाळी उगवत्या सूर्याने जगामध्ये प्रकाश पसरवला पण आमच्या जीवनात मात्र अंधार निर्माण झाला. वडिलांनी देहत्याग केला. अश्रूंची भाषा असती तर काहीतरी लिहू शकलो असतो. पुन्हा एकदा मला हाक मारा ना.. बबलू', अशी भावुक पोस्ट करुन शैलेश लोढांनी दुःख व्यक्त केलं.

Web Title: tmkoc actor shailesh loadha father shyam singh lodha passed away