सुधा मूर्तींना आदर्श मानते तितीक्षा तावडे, म्हणाली, "त्यांची साधी राहणी आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:04 IST2024-03-09T15:04:36+5:302024-03-09T15:04:51+5:30

समाजसेवा, धर्मादाय आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या सुधा मूर्ती या अनेकांच्या आदर्श आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडेदेखील सुधा मूर्तींना आदर्श मानते. 

Titiksha Tawde said sudha murthy is my inspiration her simple living inspires me | सुधा मूर्तींना आदर्श मानते तितीक्षा तावडे, म्हणाली, "त्यांची साधी राहणी आणि..."

सुधा मूर्तींना आदर्श मानते तितीक्षा तावडे, म्हणाली, "त्यांची साधी राहणी आणि..."

इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि उद्योजिका सुधा मूर्ती यांची नुकतीच राज्यसभेच्या सदस्या म्हणून निवड करण्यात आली आहे. सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. समाजसेवा, धर्मादाय आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या सुधा मूर्ती या अनेकांच्या आदर्श आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडेदेखील सुधा मूर्तींना आदर्श मानते. 

अनेक मालिकांमध्ये काम करून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या तितीक्षाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'लोकमत फिल्मी'शी खास संवाद साधला. यावेळी तितीक्षाने सुधा मूर्तींकडून प्रेरणा मिळते असं सांगितलं. ती म्हणाली, "सुधा मूर्ती या माझ्या महिला आदर्श आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचं त्या उत्तम उदाहरण आहेत. त्या कायमच  माझ्या आदर्श राहतील." 

तितीक्षा तावडे हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून तितीक्षाने मराठी कलाविश्वात तिचं वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 'सरस्वती', 'तू अशी जवळी राहा' या मालिकांमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली होती. तितीक्षाने नुकतंच अभिनेता सिद्धार्थ बोडकेशी लग्नगाठ बांधली आहे. 

Web Title: Titiksha Tawde said sudha murthy is my inspiration her simple living inspires me