n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">टायगर श्राॅफ हा खूपच चांगला डान्सर आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच त्याने हे सिद्ध केले आहे. हृतिक रोशन, शाहिद कपूर यांच्यासोबतच एक चांगला डान्सर म्हणून आज टायगरचे नाव घेतले जाते. टायगर नुकताच कॉमेडी नाईट्स लाईव्ह या कार्यक्रमात जॅकलिन फर्नांडिस आणि रेमो डिसोझा यांच्यासोबत आला होता. या कार्यक्रमात त्याने खूप मजा-मस्ती करण्यासोबतच नृत्येदेखील सादर केले. या कार्यक्रमात रेमो डिसोझाने टायगरविषयीचे एक गुपित सगळ्यांना सांगितले. टायगर खूप चांगला नर्तक असला तरी भांगडा हे नृत्य करायचे असे त्याला कोणी सांगितले तर त्याला घाम फुटतो असे रेमोने सांगितले. हे सांगताच भारती सिंगने टायगरला भांगडा शिकवला आणि काहीच वेळात टायगरने भांगडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.