"माझ्या नवीन घरातला हा पहिला गणपती आहे", 'लक्ष्मी निवास' फेम कुणाल शुक्लाने सांगितलं घरच्या बाप्पाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:03 IST2025-08-29T16:02:12+5:302025-08-29T16:03:56+5:30

Lakshmi Niwas Fame Kunal Shukla : 'लक्ष्मी निवास' मालिकेत सिद्धीराज गाडेपाटीलची भूमिका साकारणारा अभिनेता कुणाल शुक्लाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. त्याने आपल्या घरच्या बाप्पासाठी काय आणि कशी खास तयारी केली याबद्दल सांगितले.

"This is the first Ganpati in my new house," said Kunal Shukla of 'Lakshmi Niwas' fame about the Bappa of the house. | "माझ्या नवीन घरातला हा पहिला गणपती आहे", 'लक्ष्मी निवास' फेम कुणाल शुक्लाने सांगितलं घरच्या बाप्पाबद्दल

"माझ्या नवीन घरातला हा पहिला गणपती आहे", 'लक्ष्मी निवास' फेम कुणाल शुक्लाने सांगितलं घरच्या बाप्पाबद्दल

सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. कलाकारांच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे. शूटिंग सांभाळून बाप्पाच्या आगमनासाठी  तयारी करणं हे त्यांच्यासाठी ही रोमांचक आहे. 'लक्ष्मी निवास' (Lakshmi Niwas Serial) मालिकेत सिद्धीराज गाडेपाटीलची भूमिका साकारणारा अभिनेता कुणाल शुक्ला(Kunal Shukla)च्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. त्याने आपल्या घरच्या बाप्पासाठी काय आणि कशी खास तयारी केली याबद्दल सांगितले.

कुणाल शुक्ला म्हणाला की, "गणपती म्हणजे माझ्यासाठी तो सण आहे ज्यात सगळेजण आपली कामं, टेंशन बाजूला ठेऊन एकत्र येतात. मित्र-परिवारासोबत वेळ घालवतात. सगळीकडे सकारात्मक वातावरण असतं, ज्यामुळे आपणही मानसिकदृष्ट्या ताजेतवाने होतो. आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. यावर्षी खास म्हणजे माझ्या नवीन घरातला हा पहिला गणपती  आहे, तेव्हा हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. ह्यावर्षीच्या सजावटीसाठी मी खूप उत्साही आहे." 


तो पुढे म्हणाला की, "मी सेटवरून सगळं मॉनिटर केलं. एका ठिकाणी घरच्या बाप्पाची तयारी तर सेटवरही आमचं गणपती शूट चालू होतं आणि गणपतीची  सगळ्यांना सुट्टी मिळावी, म्हणून आम्ही डे-नाईट गणपती सीन शूट केले. माझ्यासाठी शूटमुळे आधीच गणेशोत्सव सुरु झाला आहे आणि त्यामुळे उत्साह  अजून वाढला आहे."

Web Title: "This is the first Ganpati in my new house," said Kunal Shukla of 'Lakshmi Niwas' fame about the Bappa of the house.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.