असा शूट झाला 'लक्ष्मीनिवास'मधील जयंत आणि जान्हवीच्या शाही लग्न सोहळ्याचा सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:43 IST2025-01-31T15:43:04+5:302025-01-31T15:43:56+5:30

Paru And Lakshmi Niwas Serial : सध्या प्रेक्षकांमध्ये आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'पारू' आणि 'लक्ष्मी निवासच्या' भव्य मंगलकार्याची.

This is how Jayant and Janhvi's royal wedding ceremony scene was shot in Lakshmi Nivas | असा शूट झाला 'लक्ष्मीनिवास'मधील जयंत आणि जान्हवीच्या शाही लग्न सोहळ्याचा सीन

असा शूट झाला 'लक्ष्मीनिवास'मधील जयंत आणि जान्हवीच्या शाही लग्न सोहळ्याचा सीन

सध्या प्रेक्षकांमध्ये आणि  सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'पारू' (Paru) आणि 'लक्ष्मी निवास(Lakshmi Niwas )च्या' भव्य मंगलकार्याची. या महासोहळ्यासाठी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री असो, महालात शूट असो, लग्नातले शाही पोशाख असो किंवा अतिथींसाठी बनवलेले पंचपक्वान्न सर्व गोष्टी अव्वल दर्जाच्या होत्या. कलाकारांनी या भव्य मंगलकार्याबद्दल बोलताना आपली उत्सुकता दर्शवली. 

लक्ष्मी निवासमध्ये जयंतची भूमिका साकारत असलेला मेघन जाधव म्हणाला, "जेव्हा आम्ही ते भव्य महाल पाहिला आणि आम्हाला कळले की या महालात आपण पारू आणि लक्ष्मी निवासच भव्य मंगलकार्य शूट करत आहोत. आम्ही सर्वजण अगदी भारावून गेलो. या महालात आता पर्यंत मोठे-मोठे हिंदी सिनेमे, वेब सीरिज आणि जाहिरातींचं चित्रीकरण झालं आहे. पण पहिल्यांदा एका मालिकेचं आणि ते ही मराठी मालिकेचं शूट होत आहे. या महालचा लुक एकदम राजस्थानच्या राजवाड्यांसारखा आहे आणि तो बघताना आपण काहीतरी आद्वितिय  पाहत आहोत असे वाटते. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही हा महाल आपल्या पुण्यातच आहे. यासाठी संपूर्ण झी मराठी टीम, क्रिएटिव्ह टीम आणि प्रोडक्शन टीमचं कौतुक आहे. 


तो पुढे म्हणाला की, जेव्हा शूट सुरु झालं वाटतच नव्हतं की कुठच्या मालिकेचं शूट होत आहे असं वाटत होत एका भव्य सिनेमाचं शूट सुरु आहे, कारण १.३० तासाचा एपिसोड ६ दिवस प्रेक्षकांसाठी आणायचा खूप मोठी गोष्ट साध्य करायचा प्रयत्न करत आहोत. हा पॅलेस सिंहगड किल्ल्याजवळ आहे त्यामुळे आम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहू शकतो, इकडचे  खास पदार्थ मागवतो आणि रात्री आम्ही चांदण्या पाहतो जे मुंबईत करता येत नाही, काम आणि मज्जा दोन्ही गोष्टी आम्ही इथे अनुभवतोय. आम्ही दोन्ही मालिकांचे ५० ते ६० कलाकार रोज एकत्र बसून जेवतो. अजून एक गोष्ट आवर्जून सांगायची म्हणजे मुंबईहुन एक बस सजवून आली होती ज्यात आमच्या भव्य मंगलकार्यात सहभागी होण्यासाठी पत्रकार मंडळी खास तयार होऊन आली होती. आम्ही या खास पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी पंचपक्वान्नच्या जेवणाचं आयोजन केले होते. ते आल्यावर त्यांचं ढोल-ताश्यानी स्वागत करून खूप नाचलो. त्यांच्या येण्याने अधिक उत्साह वाढला कारण आपण मेहनत करत आहोत आणि त्या कामाला प्रोत्साहान द्यायला कोण आले याचा आनंद नेहमीच असतो. माझा या महालात स्मरणात राहणार सीन आहे तो जयंत आणि जान्हवीचा महालाच्या टेरेसवर शूट केलेला सीन जिथे जान्हवीला जयंत चंद्र-चांदण्या दाखवत आहे. हाच सीन जर आम्ही मुंबई मध्ये केला असता तर प्रसंग वेगळा असता. 


जान्हवी म्हणजेच दिव्या पुगावकर म्हणाली, "हे भव्य मंगलकार्य शूट करायला खूप मज्जा येत आहे. आम्हाला शूटला यायच्या आधी सांगितले होत पण ते इतकं भव्य असणार आहे ते आम्हाला नंद महाल मध्ये आल्यावर कळलं. हे महाल इतका अवाढव्य आहे शाही विवाह सोहळा आहे जयंत-जान्हवीचा  हा विचारच भारावून नेतो. हेक्टिक शेड्युल जरी असलं तरीही शूटिंग एन्जॉय करत काम चालू आहे. मला एक सीन जो इथे शूट केलेला माझ्या करियर मध्ये सदैव स्मरणात राहील तो म्हणजे जान्हवीच्या लग्नाची एन्ट्री, हा सीन फुलांच्या चादरीखाली शूट केला गेला आणि ज्याप्रकारे त्याच चित्रीकरण झाले आहे तुम्हालाही नक्की पाहायला आवडेल."
 

Web Title: This is how Jayant and Janhvi's royal wedding ceremony scene was shot in Lakshmi Nivas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.