"बिग बॉसचे विजेते आधीच ठरतात, लोकांना...", Ex-विनर शिल्पा शिंदेनं केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:13 IST2025-01-13T11:12:59+5:302025-01-13T11:13:45+5:30

Bigg Boss 18: 'बिग बॉस १८' चा अंतिम सोहळा १९ जानेवारीला पार पडणार आहे. या सीझनचा विजेता कोण ठरणार हे त्यादिवशी कळेल. दरम्यान, 'बिग बॉस ११'ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

''The winners of Bigg Boss are already decided, people...", Ex-winner Shilpa Shinde made a dig | "बिग बॉसचे विजेते आधीच ठरतात, लोकांना...", Ex-विनर शिल्पा शिंदेनं केली पोलखोल

"बिग बॉसचे विजेते आधीच ठरतात, लोकांना...", Ex-विनर शिल्पा शिंदेनं केली पोलखोल

'बिग बॉस १८' (Bigg Boss 18)चा अंतिम सोहळा १९ जानेवारीला पार पडणार आहे. या सीझनचा विजेता कोण ठरणार हे त्यादिवशी कळेल. व्हिव्हियन डिसेना की करणवीर मेहरा विजेते ठरणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. काही लोक म्हणतात की 'बिग बॉस का लाडला' विजेता होणार नाही किंवा 'मिट्टी का तेल' ट्रॉफी घरी नेऊ शकत नाही. दरम्यान, 'बिग बॉस ११'ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे(Shilpa Shinde)चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये शिल्पा शिंदे म्हणतेय की, 'मला माहित नाही, पण काही लोकांना कळले आहे की निर्माते स्वतः विजेता आधीच ठरवतात. ते स्वतःच ठरवतात. ते त्यांच्या घरून घेऊन येतात आणि स्वतःच दाखवतात. त्यामुळे चॅनेलची रणनीती काहीही असली तरी लोकांना ते कळले आहे असे मला वाटते. त्यामुळे कदाचित लोक आता शो पाहत नाहीत. तुम्ही एका मर्यादेपर्यंत लोकांना मूर्ख बनवू शकता, त्या पलीकडे नाही.


व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स म्हणाले..
शिल्पा शिंदेच्या या व्हिडिओवर युजर्सकडून अनेक कमेंट येत आहेत. एकाने लिहिले की, 'शिल्पा बरोबर आहे, तू स्वतःला एक्सपोझ केलेस. हिना खान तुझ्यापेक्षा जास्त विजेती बनण्यासाठी पात्र होती. दुसऱ्याने लिहिले की, 'बरोबर बोलली शिल्पा.' आणखी एका युजरने लिहिले आहे की, 'तुझ्या सीझनमध्येही तू प्रेक्षकांना मूर्ख बनवले होते आणि तुला जिंकवले होते.'

कोण होणार 'बिग बॉस १८'चा विजेता? 
'बिग बॉस ११' मधील सर्वात कठीण स्पर्धा शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात होती. त्यानंतर हिना त्या सीझनची विजेती ठरेल असा अंदाज बांधला जात होता, पण शिल्पा शिंदेने ट्रॉफी जिंकली. त्यावेळीही सोशल मीडियावर लोकांचा असा विश्वास होता की हिना खान जिंकण्यासाठी पात्र होती. आणि आता शिल्पा शिंदेचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हाच मुद्दा उपस्थित झाला आहे. दरम्यान आता विवियन डिसेना, करणवीर मेहरा, रजत दलाल की अविनाश मिश्रा यांच्यापैकी 'बिग बॉस १८' चा विजेता कोण होणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: ''The winners of Bigg Boss are already decided, people...", Ex-winner Shilpa Shinde made a dig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.