विश्वास आणि फसवणुकीचा अनोखा खेळ! 'द ट्रेटर्स' शोचा प्रोमो रिलीज, करण जोहर करणार सूत्रसंचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 16:11 IST2025-05-23T16:10:43+5:302025-05-23T16:11:11+5:30
करण जोहर प्राइम व्हिडीओवर नवीन शो घेऊन येणार आहे

विश्वास आणि फसवणुकीचा अनोखा खेळ! 'द ट्रेटर्स' शोचा प्रोमो रिलीज, करण जोहर करणार सूत्रसंचालन
प्राइम व्हिडिओने आज त्यांच्या बहुप्रतिक्षित अनस्क्रिप्टेड ओरिजिनल शो द ट्रेटर्सच्या प्रीमियरची घोषणा केली. IDTV च्या BAFTA आणि Emmy पुरस्कार विजेत्या जागतिक फॉरमॅटवर आधारित असलेला हा शो भारतात All3Media International च्या सहकार्याने आणि BBC Studios India Productions च्या निर्मितीत सादर करण्यात येत आहे. हा जगभरातील सर्वात वेगाने लोकप्रिय होणाऱ्या रिअॅलिटी शो फॉरमॅट्सपैकी एक असून ३० पेक्षा अधिक देशांमध्ये याचे ३५ हून अधिक आवृत्त्या तयार झाल्या आहेत.
भारतीय प्रेक्षकांसाठी या विशेष आवृत्तीत करण जोहर होस्ट म्हणून आपला ग्लॅमर आणि खास शैली घेऊन येणार असून शोमध्ये भारतभरातील विविध क्षेत्रातील २० प्रसिद्ध सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होणार आहेत. विश्वास आणि फसवणुकीच्या या अनोख्या खेळात प्रत्येकजण मोठ्या रोख बक्षिसासाठी आणि ‘अल्टिमेट विनर’च्या किताबासाठी स्पर्धा करणार आहेत.
प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्राइम व्हिडिओने आधी एक आकर्षक आउटडोअर प्रचार मोहिम राबवली आणि त्यानंतर करण जोहरने एक खास व्हिडिओद्वारे केवळ प्रीमियरची तारीख जाहीर केली नाही, तर शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींबाबत काही संकेत देखील दिले. या व्हिडिओत ड्रामा, थरार आणि अप्रतिम ट्विस्टची झलकही पाहायला मिळणार आहे. हा शो १२ जून २०२५ पासून केवळ प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होईल आणि त्यानंतर प्रत्येक गुरुवारी रात्री ८ वाजता (IST) नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील. या शोचा प्रोमो व्हिडीओ पाहिल्यावर सर्वांना हा शो ओटीटीवर पाहण्याची उत्सुकता आहे