‘मन उडु उडु झालं’च्या टीमने असा केला सेटवरील शेवटचा दिवस सेलिब्रेट, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 16:32 IST2022-07-26T16:27:32+5:302022-07-26T16:32:50+5:30
'Man Udu Udu Zhala: लवकरच ही मालिका निरोप घेणार म्हटलावर या या मालिकेचं शेवटच्या दिवसाचे शूटिंगही नुकतेच संपलय.

‘मन उडु उडु झालं’च्या टीमने असा केला सेटवरील शेवटचा दिवस सेलिब्रेट, व्हिडीओ व्हायरल
झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडु उडु झालं’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. इंद्रा आणि दिपू यांची प्रेमकथा प्रेक्षकांना भावली. चाहत्यांना यांची लव्हस्टोरी खूप आवडलीये. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणारे. मालिकेतील शेवट्या भागात इंद्रा-दिपूचं लग्न दाखवण्यात आलयं. लवकरच ही मालिका निरोप घेणार म्हटलावर या या मालिकेचं शेवटच्या दिवसाचे शुटिंगही नुकतेच संपलय. आणि सेटवर शेवटच्या दिवशी या मालिकेतील कलाकारांनी धमाल आणि मजामस्ती करत त्यांचा हा शेवटचा दिवस सेलिब्रेट केलाय.
याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. तसेच या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अजिंक्य राऊतनेही सोशल मीडियावर काही स्टेरी पोस्ट केल्यात. सेटवरील कलाकारांसोबतच संपूर्ण टीम या व्हिडीओत डान्स करताना दिसतेय. मन उडुच्या टिमचा हा सेलिब्रेशन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मन उडु ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली. या मालिकेचं कथानक प्रेक्षकांना खूपच भावालं. तसेच मालिकेतील इंद्रा-दिपूची जोडी ही छोट्या पडद्यावरील ट्रेडिंग जोडी बनलीये. सोशल मीडियावर या जोडीचा तसेच या मालिकेचा चाहतावर्ग ही आहे. आता ही मालिका निरोप घेणार असून चाहत्यांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण पाहायला मिळतयं.