जय श्री कृष्णामधील छोट्या कान्हाची भूमिका साकारली होती या चिमुरडीनं, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:25 IST2022-02-28T16:09:59+5:302022-02-28T16:25:04+5:30

जय श्री कृष्ण(Jai Shri Krishna) ही मालिका सर्वांनाच खूप आवडली होती. एक काळ असा होता की ही मालिका पाहिल्याशिवाय ...

The little Kanha in Jai Shri Krishna is visible now, it is difficult to recognize even by looking at the photo | जय श्री कृष्णामधील छोट्या कान्हाची भूमिका साकारली होती या चिमुरडीनं, आता दिसते अशी

जय श्री कृष्णामधील छोट्या कान्हाची भूमिका साकारली होती या चिमुरडीनं, आता दिसते अशी

जय श्री कृष्ण(Jai Shri Krishna) ही मालिका सर्वांनाच खूप आवडली होती. एक काळ असा होता की ही मालिका पाहिल्याशिवाय लोकांचा दिवस पूर्ण व्हायचा नाही. त्याचवेळी मालिकेतील छोटा कान्हा टीव्हीच्या दुनियेत रमून गेला होता. त्या छोट्या गोपाळचा आवाज, भाव आणि शैली पाहून लोक त्याचे खूप कौतुक करायचे. त्याचबरोबर लहान गोपालच्या भूमिकेत दिसणारा मुलगा  नसून मुलगी आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. होय, जय श्री कृष्णामध्ये धृती भाटियाDhriti Bhatia) ने छोट्या कन्हैयाची भूमिका साकारली होती.

 धृती भाटिया(Dhriti Bhatia)बद्दल बोलायचे झाले तर ती खूप मोठी झाली आहे.  धृती भाटियाचे काही फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून धृती भाटियाला ओळखणं खूप कठीण जातेय.  फोटो पाहून एका यूजरने लिहिले की, माझा विश्वास बसत नाही की तू तोच छोटा कन्हैया होतीस, तर दुसऱ्या यूजरने तिच्या कामाचे खूप कौतुक केले.


धृती भाटियाला फक्त अभिनयाचीच नाही तर डान्सचीही खूप आवड आहे कारण तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे एक नाही तर अनेक डान्स व्हिडिओ आहेत. धृतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ती जय श्री कृष्णानंतर डोंट वरी चाचू आणि इस प्यार को क्या नाम दूं  (Iss Pyaar Ko Kya Naam Doon) सारख्या शोमध्ये दिसली आहे. धृतीला भविष्यात कोरिओग्राफर व्हायचे आहे.

Web Title: The little Kanha in Jai Shri Krishna is visible now, it is difficult to recognize even by looking at the photo