'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेता बनला बाबा, लेकीला पाहताच पाणावले डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 12:04 IST2025-05-25T12:03:45+5:302025-05-25T12:04:13+5:30
'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेता आणि कॉमेडियन पारितोष त्रिपाठीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. पारितोष त्रिपाठी बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेता बनला बाबा, लेकीला पाहताच पाणावले डोळे
'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेता आणि कॉमेडियन पारितोष त्रिपाठीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. पारितोष त्रिपाठी बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. पारिषोतची पत्नी मिनाक्षी हिने गोंडस लेकीला जन्म दिला आहे. २३ मे रोजी पारितोषच्या घरी पाळणा हलला आहे. सोशल मीडियावरुन अभिनेत्याने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
पारितोषने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांना दिली. "बेबी गर्लचं स्वागत आहे...२३ मे २०२५, पारितोष आणि मिनाक्षी", असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. "बहुत बोलने वाला चुपचाप है, बरसती आँखे कह रहीं वो बिटिया का बाप है", असं म्हणत त्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही पारितोष आणि त्याच्या पत्नीचं अभिनंदन केलं आहे.
पारितोषने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. जनहित में जारी, हमारे बारह, सेल्फी, वनवास, लव की अरेंज मॅरेज अशा सिनेमांमध्ये तो दिसला. कपिल शर्मा या शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. काही शोचं त्याने सूत्रसंचालनही केलं आहे. ९ डिसेंबर २०२२ मध्ये पारितोष आणि मिनाक्षी लग्नाच्या बेडीत अडकले होते. लग्नानंतर अडीच वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत.