'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरू होतेय श्री क्षेत्र तुळजापूरची महागाथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:46 IST2025-01-20T16:46:19+5:302025-01-20T16:46:48+5:30

Aai Tulja Bhavani Serial : 'आई तुळजाभवानी' मालिका दिवसेंदवस अधिकाधिक रोमांचक होत चालली आहे. तुळजा भवानी आईचे चमत्कार आणि मालिकेतील घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत.

The epic story of Shri Kshetra Tuljapur begins in the series 'Aai Tulja Bhavani'! | 'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरू होतेय श्री क्षेत्र तुळजापूरची महागाथा!

'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरू होतेय श्री क्षेत्र तुळजापूरची महागाथा!

कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी मालिका दिवसेंदवस अधिकाधिक रोमांचक होत चालली आहे. तुळजा भवानी आईचे चमत्कार आणि मालिकेतील घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत. अखेर मालिकेत कद्दारासूराचा वध आई तुळजाभवानीच्या हातून झाला आणि गावकऱ्यांना त्या बलाढ्य असूरा पासून मुक्तता मिळाली. हे घडत असतानाच आई तुळजाभवानीची मदत करण्यासाठी भूतलावर भवानीशंकर रूपात महादेव प्रकट झाले. आता महादेवांनी रांगडे भवानी शंकर रूप का घेतले हे हळूहळू उलघडेल. पण आता मालिकेत सुरू होणार आहे श्री क्षेत्र तुळजापूरची महागाथा. 

आई तुळजाभवानी या मालिकेत महाराष्ट्राच्या पावनभूमीत मांजरा नदीकाठी असलेल्या एका गावात सध्या तुळजाभवानीचा मुक्काम असून भक्तरक्षणाचा दैवी अध्याय तिथे उलगडतो आहे. कद्दरासुराच्या अंतानंतर देवी आता या गावातून तिचा कायमचा वास असेल अश्या अढळ स्थानाच्या दिशेने प्रस्थान करण्याचे ठरवते. यासाठी ती काळ-भैरवाला बोलावणं धाडते. तिकडे महादेवही काळभैरवाला मार्गदर्शन करतात. 


देवीचे हे अढळस्थान शोधण्याची ही दैवी लीला, महादेवांचीच तर नाही ना ?, या कामासाठी काळभैरवाचीच नियुक्ती का? आज तुळजापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाची उत्पती कशी झाली. याची रंजक कथा आई तुळजाभवानीच्या आगामी भागात उलगडणार  आहे, काळभैरवाचा हा कथाभाग येत्या रविवारी १९ जानेवारीला रात्री ९ वाजता आई तुळजाभवानीच्या विशेष भागात सादर होईल. 

Web Title: The epic story of Shri Kshetra Tuljapur begins in the series 'Aai Tulja Bhavani'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.