'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये लगीनघाई! राजवाडे घराण्याचा भव्य विवाह सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:26 IST2025-10-28T19:26:03+5:302025-10-28T19:26:34+5:30
Veen Doghatali Hi Tutena Serial : गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात, आधिरा- रोहन आणि स्वानंदी- समर यांच्या यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे.

'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये लगीनघाई! राजवाडे घराण्याचा भव्य विवाह सोहळा
झी मराठीने आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी वेगळं आणि लक्षवेधी सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे आणि यावेळी देखील पुन्हा एकदा हाच झी मराठीचा छोटा पडदा एका अविस्मरणीय सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे राजवाडे घराण्याच्या लग्नसोहळ्यासाठी! ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेतील हा विवाह सोहळा मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात नवा मानदंड निर्माण करणार आहे.
मुहूर्त ठरलाय, तयारी जोरात सुरू आहे. २९ ऑक्टोबरपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत हा जल्लोष रंगणार असून, राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब प्रत्येक दिवस एक नवा सोहळा घेऊन येणार आहेत. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात, आधिरा- रोहन आणि स्वानंदी- समर यांच्या यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. मुहूर्तमेढ, मेहेंदी, चुडा, हळद, सीमांत पूजन आणि शेवटी अविस्मरणीय विवाहसोहळा हा प्रत्येक कार्यक्रम या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत २९ ऑक्टोबरला मुहूर्तमेढ, ३० आणि ३१ ऑक्टोबरला मेहेंदी, १ आणि २ नोव्हेंबरला चुडा, ५ आणि ६ नोव्हेंबरला हळद, ७ नोव्हेंबरला सीमांत पूजन आणि १० आणि ११ नोव्हेंबरला अविस्मरणीय विवाह सोहळा पार पडणार आहे. परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा मिलाप असलेला हा विवाह सोहळा प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरणार आहे.