'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सावलीचा स्टंट पाहून प्रेक्षक झाले थक्क, करताहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:21 IST2025-07-22T19:19:48+5:302025-07-22T19:21:07+5:30

Savalyanchi Janu Savali Serial: 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेमध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने सावलीची भूमिका साकारली आहे. सावलीच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती देखील मिळतेय. दरम्यान आता मालिकेत सावलीने केलेल्या स्टंटचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

The audience was amazed to see Savali's stunt in the series 'Savalyanchi Janu Saavli' and they are praising it. | 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सावलीचा स्टंट पाहून प्रेक्षक झाले थक्क, करताहेत कौतुक

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सावलीचा स्टंट पाहून प्रेक्षक झाले थक्क, करताहेत कौतुक

झी मराठीवरील सध्याची लोकप्रिय मालिका 'सावळ्याची जणू सावली' (Savalyanchi Janu Savali Serial) कमी कालावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आगळावेगळा विषय असलेली मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) हिने सावलीची भूमिका साकारली आहे. सावलीच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती देखील मिळतेय. दरम्यान आता मालिकेत सावलीने केलेल्या स्टंटचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक प्राप्तीचं कौतुक करत आहेत.

मालिकेत मंदिरात पूजा करून मूळस्थानी दिवा प्रज्वलन करण्यासाठी सारंग जाणार असतो. कुणीतरी सावलीला घरात बंद करून जातं. सारंगच्या जीवाला धोका असल्यामुळे सावली दुसऱ्या माळ्यावरून साडीच्या साहाय्याने खाली उतरते आणि सारंगच्या मदतीसाठी जाते. साडीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा सीन प्राप्तीने कुणाच्या मदतीशिवाय केला आहे. तिने त्याचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती स्वतः कोणाच्या मदतीशिवाय न घाबरता उतरताना दिसली होती.


मालिकेबाबत
प्राप्ती रेडकरसोबत या मालिकेत साईंकित कामत मुख्य नायकाच्या भूमिकेत आहेत. 'सावळ्याची जणू सावली'मध्ये साईंकित सारंग ही भूमिका साकारत आहे. तर सुलेखा तळवलकर तिलोत्तमाच्या भूमिकेत आहेत. 'बिग बॉस मराठी' फेम वीणा जगतापही या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. 

वर्कफ्रंट
प्राप्ती रेडकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने बालकलाकार म्हणून मराठी कलाविश्वात पदार्पण केलंय. तिने ‘किती सांगायचंय मला’, ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती सावळ्याची जणू सावली मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते आहे. 

Web Title: The audience was amazed to see Savali's stunt in the series 'Savalyanchi Janu Saavli' and they are praising it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.