'रंग माझा वेगळा' मालिकेतून या अभिनेत्रीनं घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:19 IST2022-05-16T12:19:22+5:302022-05-16T12:19:49+5:30

Rang Maza Vegla: सध्या रंग माझा वेगळा मालिका रंजक वळणावर आली आहे.

The actress took a break from the series 'Rang Mazha Vegla', a big reason came to the fore | 'रंग माझा वेगळा' मालिकेतून या अभिनेत्रीनं घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

'रंग माझा वेगळा' मालिकेतून या अभिनेत्रीनं घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान या मालिकेतील एका अभिनेत्रीने ब्रेक घेतल्याचे समजते आहे. ही अभिनेत्री कोण असेल आणि तिने ब्रेक का घेतला असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर ही अभिनेत्री म्हणजे रंग माझा वेगळा मालिकेत दीपाची मैत्रीण साक्षी. साक्षीची भूमिका अभिनेत्री मानसी घाटे (Manasi Ghate) हिने साकारली आहे. तिने ब्रेक घेण्यामागचे मोठे कारण समोर आले आहे.

रंग माझा वेगळा मालिकेत साक्षीची भूमिका अभिनेत्री मानसी घाटे हिने साकारली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानसी घाटे हिची तब्येत खूप बिघडल्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. इतकेच नाही तर तिला लगेच मालिकेत रुजू होता येणार नाही आहे. तिला डॉक्टरांनी सक्त आराम करण्याची ताकीद दिली आहे. त्यामुळे काही दिवस मानसी घाटे आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार नाही.


दरम्यान मानसीला भेटण्यासाठी तिची ऑनस्क्रीन मैत्रीण दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) गेली होती. तिने मानसीसोबतचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करून लवकर बरी हो असे लिहिले आहे. तिला बरे वाटल्यानंतर ती पुन्हा मालिकेत काम करताना पाहायला मिळेल.


सध्या रंग माझा वेगळा मालिका रंजक वळणावर आली आहे. सौंदर्यासोबतच आता दीपिका आणि कार्तिकीलादेखील दीपा आणि कार्तिकने एकत्र यावे असे वाटत आहे. त्यामुळे त्या तिघी खूप प्रयत्न करत आहे. सौंदर्या मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने दीपा आणि कार्तिकला एकत्र आणते. जेणेकरून ते दोघे एकत्र काम करत असताना त्यांना जुने दिवस आठवतील आणि ते पुन्हा एकत्र येतील. त्यामुळे आगामी भागात काय घडते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: The actress took a break from the series 'Rang Mazha Vegla', a big reason came to the fore