'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, तिचा पतीदेखील आहे अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 21:46 IST2022-01-25T21:46:28+5:302022-01-25T21:46:47+5:30
तुझ्यात जीव रंगला (Tuzyat Jeev Rangala) आणि गर्ल्स हॉस्टेल (Girls Hostel) मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, तिचा पतीदेखील आहे अभिनेता
तुझ्यात जीव रंगला (Tuzyat Jeev Rangala) आणि गर्ल्स हॉस्टेल (Girls Hostel) मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मुग्धा परांजपे (Mugdha Paranjape) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिने प्रसिद्ध अभिनेते रविंद्र मंकणी यांचा मुलगा म्हणजेच सुश्रुत मंकणी (Sushrut Mankani) याच्याशी लग्न केले आहे. सुश्रुत मंकणीदेखील अभिनेता आहे. त्याने देवयानी (Devyani) या मालिकेत काम केले आहे.
अभिनेत्री मुग्धा परांजपे सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या लग्नाचे आणि हळदीचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हळदीच्या समारंभात तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हातावर सजलेली मेहंदी आणि गाली लागलेल्या हळदीने तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.
हळदीच्या फोटोंमध्ये तिने मेहंदीचे देखील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सुश्रुत देखील तिच्याबरोबर आहे. हा फोटो शेअर करत मुग्धाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी आणि माझं संपूर्ण जग.”
मुग्धाने लग्नाचे देखील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका फॅमिली फोटोत मुग्धा तिचा पती, आई वडील, सासू सासरे देखील खूप खुश दिसत आहेत. सुश्रुत आणि मुग्धाने एका फार्महाऊसमध्ये लग्न केले आहे. मुग्धाने अभिनय क्षेत्रात बरेच काम केले. अशात ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत देखील ती झळकली होती. त्यानंतर तिने गर्ल्स हॉस्टेल मालिकेत काम केले आहे.
मुग्धाचे सासरे म्हणजेच रवींद्र मंकणी यांनी मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रमा माधव, निवडुंग, बाप माणूस, वारसा लक्ष्मीचा, विट्टी दांडू, वास्तुपुरुष या चित्रपटात झळकले आहेत. सुश्रुत मंकणीने भाग्यलक्ष्मी, झाले मोकळे आकाश आणि देवयानी मालिकेत काम केले आहे. तसेच त्याने बेधडक चित्रपटात काम केले आहे.