'मुरांबा' मालिकेतील अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात,साखरपुड्याचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 20:08 IST2023-03-01T20:08:21+5:302023-03-01T20:08:46+5:30
वनिता खरात नंतर आता आणखी एक अभिनेता लग्नगाठ बांधणार आहे. त्याने नुकतेच साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

'मुरांबा' मालिकेतील अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात,साखरपुड्याचे फोटो आले समोर
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता सुमित भोकसे(Sumit Bhokse)चा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. मधुरा केळुस्करसोबत सुमितने साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अक्षया नाईक, पूजा ठोंबरे, प्रथमेश परब, चिन्मई साळवी, भाग्यश्री मिलिंद, मनमित पेम, वेदांगी कुलकर्णी, तन्वी बर्वे हे कलाकार उपस्थित होते.
अभिनेता सुमित भोकसे आणि मधुरा केळुस्कर यांचा साखरपुडा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. साखरपुड्याचे काही खास क्षण सुमितने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.
सुमित भोकसे नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेत पाहायला मिळाला. त्याने नवरी मिळे नवऱ्याला, पाहिले न मी तुला, मुरांबा, इयर डाऊन अशा मालिकेत काम केले आहे. तसेच एक नंबर या चित्रपटात सुमित एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. बोल्ड सीन्समुळे हा चित्रपट खूपच चर्चेत आला होता. कॉलेजमध्ये असताना नाटक, एकांकिका मधून सुमित प्रकाशझोतात आला. आविष्कार या नाट्यसंस्थेशी तो जोडला गेला.
अनेक मराठी नाटकातून काम करत असताना सुमित भोकसेला फोटोग्राफीचे वेध लागले. प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून त्याने काही काळ काम केले. अशातूनच प्रथमेश परब सोबत सुमितला उर्फी चित्रपटात झळकण्याची नामी संधी मिळाली. नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेने सुमितला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती.