'द ५०'शो घेणार निरोप, समोर आली ग्रँड फिनालेची तारीख; टॉप २० मध्ये पोहोचले 'हे' स्पर्धक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:12 IST2026-02-18T15:11:28+5:302026-02-18T15:12:18+5:30
'द ५० शो'मध्ये कोण आहेत टॉप २० स्पर्धक?

'द ५०'शो घेणार निरोप, समोर आली ग्रँड फिनालेची तारीख; टॉप २० मध्ये पोहोचले 'हे' स्पर्धक
कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेला 'द ५०' शो आता निरोप घेणार आहे.१ ९ फेब्रुवारी रोजी याचा ग्रँड फिनाले शूट होणार आहे. १ फेब्रुवारीपासून सुरु झालेला शो १९ दिवसातच गुंडाळला जात आहे. ५० दिवसांचा शोचा फॉर्मॅट होता त्यातील १७ एपिसोड्सचंच ऑन एअर शूट झाले आहेत. याचा अर्थ आणखी ३३ दिवसांचे एपिसोड्स येणार आहेत.
द ५० शोमध्ये आता एकूण २० स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. शिव ठाकरे, शाइनी दोषी, मनीषा रानी, सिद्धार्थ भारद्वाज, आरुषी चावला, रिद्धी डोगरा, प्रिन्स नरुला, युविका चौधरी, सिवेट तोमर, हामिद बरकाजी, रजत दलाल, लवकेश कटारिया, विक्रांत, काका, मिस्टर फैजू, अर्चना गौतम, वंशज सिंह, उर्वशी ढोलकिया आणि कृष्णा श्रॉफचं नाव समोर येत आहे.
द ५० च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये 'द लायन' ने एलिमिनेटेड सदस्य उर्वशी ढोलकिया, खानजादी, आरुषी चावला आणि तेजस्वी माडिवाडा यांना एक संधी दिली. या चारही सदस्यांनी आपापली टीम निवडली. उर्वशी निक्की तांबोळीच्या टीममध्ये गेली. आरुषी प्रिंसच्या, खानजादी दिग्विजय राठीच्या आणि तेजस्वी माडिवाडा शिव ठाकरेच्या टीममध्ये गेली. निक्की आणि प्रिन्स नुरुला या दोन टीम जिंकल्या. अशात आरुषी आणि उर्वशी यांची शोमध्ये पुन्हा एन्ट्री झाली. तर तेजस्वी माडिवाडा आणि खानजादी यांना महल सोडून जावं लागलं. तसंच बेबिका ध्रुवेही एलिमिनेट झाली.