'The 50' Contestants: २० स्पर्धकांची नावं आली समोर, मराठमोळ्या चेहऱ्याचाही सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:27 IST2026-01-23T12:26:22+5:302026-01-23T12:27:04+5:30
'The 50' Contestant Names: रिअॅलिटी शोच्या विश्वात कलर्स टीव्ही पुन्हा एकदा धमाका करण्यास सज्ज आहे.

'The 50' Contestants: २० स्पर्धकांची नावं आली समोर, मराठमोळ्या चेहऱ्याचाही सहभाग
रिअॅलिटी शोच्या विश्वात कलर्स टीव्ही पुन्हा एकदा धमाका करण्यास सज्ज आहे. 'The 50' या नावाने नवाकोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये ५० प्रसिद्ध सेलिब्रिटी एकाच छताखाली राहून एकमेकांविरुद्ध बुद्धी आणि शक्तीचा वापर करून खेळ खेळणार आहेत. या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर या शोमधील ५० स्पर्धकांची नावे चर्चेत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या २९ नावांमध्ये टीव्ही आणि सोशल मीडियावरील मोठ्या स्टार्सचा समावेश आहे. ज्यात काही मराठी चेहरेही आहेत.
'The 50' मधील स्पर्धकांबद्दल सांगायचं तर या मराठमोळ्या शिव ठाकरेची या शोसाठी निवड झाली आहे आणि तो या सीझनमधील निश्चित स्पर्धकांपैकी एक आहे. याशिवाय, निक्की तांबोळी, करण पटेल, दिव्या अग्रवाल, मिस्टर फैजू, अर्चना गौतम, उर्फी जावेद, प्रतीक सेहजपाल, उर्वशी ढोलकिया, मोनालिसा ठाकूर, विक्रांत सिंग, शायनी दोशी, चाहत पांडे, दिग्विजय राठी, श्रुतिका अर्जुन, लव्हकेश कटारिया, रिद्धी डोग्रा, बसीर अली, अविनाश मिश्रा आणि अभिषेक बजाज यांची नावे समोर आली आहेत. तर उर्वरित स्पर्धकांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत, मात्र यात बॉलिवूड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची तगडी फौज असणार आहे.
The 50 show contestant -
— The 50 Khabri (@the50khabri) January 22, 2026
1) Karan Patel (Tv star)
2) Mr Faisu (TikToker)
3) Divya Agarwal (Tv Actress)
4) Monalisa (Actress)
5) Vikrant Singh (Monalisa husband)
6) Shiny Doshi (Tv actress)
7) Dushyant Kukreja (YouTuber
8) Chai with Ahmed (Dubai Creator)
9) Rudra Rana (model)
10)… pic.twitter.com/NfNFSBuZCU
या शोचे शूटिंग मुंबईतील मड आयलंड येथे एका भव्य राजवाड्याप्रमाणे दिसणाऱ्या सेटमध्ये झाले आहे. बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अजय देवगण या शोचे प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र, शोचा खरा होस्ट कोण असेल, याबाबत निर्मात्यांनी अजूनही सस्पेन्स कायम ठेवला आहे. हा शो १ फेब्रुवारी २०२६ पासून 'जिओ हॉटस्टार' आणि 'कलर्स' टीव्हीवर प्रसारित होणार आहे.