२ महिन्यापासून अंथरुणाला खिळून आहे ही 37 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री, झालीय तिची अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:48 AM2023-03-21T11:48:04+5:302023-03-21T12:12:12+5:30

अभिनेत्री म्हणाली, हा आजार गंभीर आहे, तिला काहीही खाता येत नाही.

The 37 year old famous actress going a serious illness details inside | २ महिन्यापासून अंथरुणाला खिळून आहे ही 37 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री, झालीय तिची अशी अवस्था

२ महिन्यापासून अंथरुणाला खिळून आहे ही 37 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री, झालीय तिची अशी अवस्था

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री शिखा सिंगला डेली सोप 'कुमकुम भाग्य'ची आलिया म्हणून ओळखले जाते. या अभिनेत्रीने शोमध्ये तिच्या खलनायकी भूमिकेने अनेक वर्षे लोकांचे मनोरंजन केले. मुलीच्या जन्मापासून ती काही काळ टीव्हीपासून दूर होती. शिखा सिंग तिच्या आरोग्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. गेल्या काही दिवसांपासून तिची तब्येत ठीक नसल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. एका मुलाखती दरम्यान तिने सांगितलं गेल्या अनेक दिवसांपासून ती अंथरुणाला खिळून आहे.

शिखाने सांगितलं की, गेल्या अनेक दिवसांपासून ती अंथरुणाला खिळून आहे. दोन महिन्यांपूर्वी त्वचेशी संबंधित आजार झाला होता. त्यावेळी समजलं की हा आजार गंभीर आहे. त्यासाठी डॉक्टरांनी औषधे दिली. ती घेतल्यानंतर शिखाला अधिक त्रास झाला. त्यानंतर डॉक्टरांनी तिला आणखी काही टेस्ट करायला सांगितलं. त्यानंतर ती फक्त खिचडी खात आहे. बाकी काहीही तिला खाता येत नाही.

शिखानं पुढं सांगितलं की, काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. त्यामुळे शिखानं तिचा ७ फेब्रुवारीला असणारा वाढदिवस नायरोबीला साजरा केला. परंतु तिथं गेल्यानंतर ती पुन्हा आजारी पडली आणि तिथं तिला रुग्णालयात दाखल केलं. तिथून घरी आले तेव्हापासून ती आराम करत आहे. तिचा नवरा करण शाह पायलट असल्यानं तो सतत बाहेर असतो.

अलीकडेच शिखा सिंहने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "मी आजारी असल्याने काळजीत आहे, माझे काय चुकले आहे ते माहित नाही." शिखाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अली गोनीपासून मृणाल ठाकूरपर्यंतचे स्टार्स तिला सपोर्ट करत आहेत.
 

Web Title: The 37 year old famous actress going a serious illness details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.