'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजीची लेक आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 12:12 IST2023-10-04T12:12:05+5:302023-10-04T12:12:40+5:30
'ठरलं तर मग' मालिकेत ज्योती चांदेकर यांनी सुभेदारांच्या घरातील पूर्णा आजीची भूमिका साकारली आहे.

'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजीची लेक आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, ओळखलंत का?
सध्या छोट्या पडद्यावर 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका चांगलीच गाजत आहे. टीआरपीतही मालिका पहिल्या क्रमांकावर असते. हटके स्टोरीमुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री तर विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. शिवाय सर्वांची लाडकी पूर्णा आजी तर आहेच. पण तुम्हाला माहितीए का पूर्णा आजी म्हणजेच ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आई आहेत.
'ठरलं तर मग' मालिकेत ज्योती चांदेकर यांनी सुभेदारांच्या घरातील पूर्णा आजीची भूमिका साकारली आहे. बाहेरुन कडक पण आतून प्रेमळ असं त्यांचं पात्र आहे. ज्योती चांदेकर यांनी अनेक मराठी सिनेमांतही काम केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. तर त्यांची मुलगी ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आणि आता निर्मातीही आहे. ती म्हणजे तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit). 'मी सिंधूताई सपकाळ' मधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री तेजस्विनी ही ज्योती चांदेकर यांची लेक आहे. तर त्यांना पूर्णिमा पंडित ही आणखी एक मुलगी आहे. मायलेकी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो अपलोड करत असतात. तेजस्विनीच्या वडिलांच्या निधनानंतर ज्योती यांनीच मुलींचा एकटीने सांभाळ केला. आज दोघींनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.
तेजस्विनी पंडितने 'रानबाजार' मध्ये बोल्ड भूमिका साकारली. शिवाय तिची आणि स्वप्नील जोशीची 'समांतर' ही वेबसिरीजही गाजली. शिवाय ती निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे.'बांबू' हा तिचा पहिलाच निर्मित चित्रपट.तसंच 'अथांग' या थरारक वेबसिरीजचीही तिने निर्मिती केली आहे.