अर्जुन आता काय ऐकत नाय! सुपरहिट बॉलिवूड गाण्यावर अभिनेत्याने केला भन्नाट डान्स, एनर्जी पाहून नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:59 IST2025-11-13T13:50:09+5:302025-11-13T13:59:56+5:30
'ठरलं तर मग' मधील अर्जुन सुभेदारचा २३ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स,व्हिडीओ बघाच

अर्जुन आता काय ऐकत नाय! सुपरहिट बॉलिवूड गाण्यावर अभिनेत्याने केला भन्नाट डान्स, एनर्जी पाहून नेटकरी म्हणाले...
Amit Bhanushali Video: 'ठरलं तर मग' या मालिकेत अर्जुन सुभेदार या भूमिकेतून अभिनेता अमित भानुशाली घराघरात लोकप्रिय झाला. सध्या तो मराठी मालिका विश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून नावारूपाला आला आहे. ठरलं तर मग मध्ये त्याने साकारलेला वकील अर्जुन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यासाठी त्याने घेतलेली मेहनतही दिसून येते. दरम्यान, अमित सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. त्या माध्यमावर आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.
'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. मात्र,आता त्याच्या अभिनयाबरोबरच डान्सचेही चाहते दिवाणे होणार आहेत.याचं कारण म्हणजे नुकताच त्याने सोशल मीडियावर त्याने २३ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट बॉलिवूड गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्याचा हा डान्स पाहून अनेकजण त्याच्या नृत्यकौशल्याचं कौतुक करत आहेत. अमित भानुशालीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर सुंदर असं कॅप्शन देऊन नवा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विवेक ओबेरॉय आणि राणी मुखर्जीच्या 'साथिया' चित्रपटातील गाणं 'ओ हम दम सुनियो रे...' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आपल्या कामातून वेळ काढत त्याने मेकअप रुममध्ये भन्ना डान्स केलाय. या व्हिडीओमधील त्याच्या भन्नाट डान्स आणि हावभावने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.‘साथिया’ चित्रपट डिसेंबर २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता.
अमितचा हा डान्स व्हिडीओ पाहून अनेकांनी कौतुक केलं, तर काहींनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप छान”, “सर, तुम्हाला चित्रपटात पाहायला आवडेल”, “किती सुंदर डान्स” अशा कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओवर अमितचा सहकलाकार चैतन्य गडकरीच्या कमेंट अनेकांचं लक्ष वेधलं आहे. ये मेकअप रूम किधर सुनेला लगता है अशी मजेशीर प्रतिक्रिया त्याने या डान्स व्हिडीओवर केली आहे. सध्या सोशल मीडियावर अमितचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.