'या' मराठी मालिकेची इस्त्रायलमध्ये क्रेझ, युद्धजन्य परिस्थितीत विरंगुळा मिळाल्यानं कुटुंबाने मानले मालिकेचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 09:22 IST2026-04-07T09:22:14+5:302026-04-07T09:22:38+5:30

अभिनेत्रीनं इस्रायलमधील चाहत्यांचा एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Tharla Tar Mag Serial Craze In Israel Jui Gadkari Emotional Video | 'या' मराठी मालिकेची इस्त्रायलमध्ये क्रेझ, युद्धजन्य परिस्थितीत विरंगुळा मिळाल्यानं कुटुंबाने मानले मालिकेचे आभार

'या' मराठी मालिकेची इस्त्रायलमध्ये क्रेझ, युद्धजन्य परिस्थितीत विरंगुळा मिळाल्यानं कुटुंबाने मानले मालिकेचे आभार

Star Pravah Marathi Serial Israel : सध्या मराठी टेलिव्हिजनवर टीआरपीमध्ये 'ठरलं तर मग' ही मालिका अव्वल स्थानी आहे. संपुर्ण महाराष्ट्रात या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. पण तुम्हाला माहित आहे का? या मालिकेची जादू फक्त महाराष्ट्रातच नाही, तर चक्क इस्रायल (Israel) पर्यंत पोहोचली आहे.  इस्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाला या मालिकेने मोठा मानसिक आधार दिला आहे. अभिनेत्री जुई गडकरी हिने इस्रायलमधील चाहत्यांचा एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. 

इस्रायलमध्ये स्थायिक असलेल्या एका कुटुंबाने व्हिडीओद्वारे मालिकेच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. हे कुटुंबीय म्हणतात, "सध्या इस्रायलमध्ये काय परिस्थिती आहे, हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. या युद्धामुळे आम्ही प्रचंड मानसिक तणावात असतो. पण अशा परिस्थितीतही 'ठरलं तर मग' मालिका पाहून आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र बसून ही मालिका पाहतो आणि एकही भाग चुकवत नाही. सायली-अर्जुनची केमिस्ट्री आणि प्रियाचा अभिनय आम्हाला खूप आवडतो".

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे ४५ मिनिटांचे विशेष भाग दररोज प्रक्षेपित होत आहेत. हे काम किती आव्हानात्मक आहे, याबद्दल जुईने आपल्या पोस्टमध्ये सविस्तर लिहिले आहे. जुई म्हणते, "रोज ४५ मिनिटांचा भाग देणं अजिबात सोपं नाही. यासाठी कलाकारच नाही तर लाईटमन, स्पॉट बॉय, सेटिंग, साऊंड, कॅमेरामन आणि मेकअप टीम रात्रंदिवस काम करत आहेत. कधी चिडचिड होते, कधी रडारड... पण ध्येय एकच असतं की एपिसोड वेळेत पूर्ण झाला पाहिजे".

इस्रायलमधील प्रेक्षकांचे प्रेम पाहून जुई भावूक झाली आहे. तिने लिहिले की, "जेव्हा जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात युद्धात अडकलेल्या आणि मराठी भाषिकही नसलेल्या प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते, तेव्हा वाटतं की आपली ही सगळी मेहनत सार्थकी लागली. आपण आपल्या कलेच्या माध्यमातून अशा कठीण परिस्थितीत कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणू शकलो, याचा आम्हाला खूप आनंद आहे".


Web Title : युद्धग्रस्त इज़राइल में मराठी धारावाहिक 'ठरला तर मग' लोकप्रिय।

Web Summary : मराठी धारावाहिक 'ठरला तर मग' ने इज़राइल में काफ़ी लोकप्रियता हासिल की है, जो युद्ध के दौरान परिवारों को सांत्वना प्रदान कर रहा है। एक इजरायली परिवार ने आभार व्यक्त करते हुए कहा कि शो उन्हें तनाव से निपटने में मदद करता है। अभिनेत्री जुई गडकरी ने टीम की कड़ी मेहनत को स्वीकार करते हुए भावनात्मक वीडियो साझा किया।

Web Title : Marathi series 'Tharala Tar Mag' gains popularity in war-torn Israel.

Web Summary : Marathi series 'Tharala Tar Mag' has gained immense popularity in Israel, providing solace to families during the war. An Israeli family expressed gratitude, stating the show helps them cope with stress. Actress Jui Gadkari shared the emotional video, acknowledging the team's hard work.