"प्रचंड त्रास…",'ठरलं तर मग' मधील अभिनेत्री १७ वर्षांपासून 'या' गंभीर आजाराने त्रस्त, म्हणाली-"अचानक सर्दी झाली, आणि.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:34 IST2026-01-09T14:30:43+5:302026-01-09T14:34:18+5:30
"उपाय सुद्धा केले, पण...", 'ठरलं तर मग' मधील अभिनेत्रीने सांगितला गंभीर आजारपणाचा अनुभव

"प्रचंड त्रास…",'ठरलं तर मग' मधील अभिनेत्री १७ वर्षांपासून 'या' गंभीर आजाराने त्रस्त, म्हणाली-"अचानक सर्दी झाली, आणि.."
Tharla Tar Mg Actress: 'ठरलं तर मग'ही टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अर्जुन-सायली,पूर्णा आजी, कल्पना सुभेदार तसेच अस्मिता, प्रिया, नागराज, सुमन काकू, रविराज किल्लेकर या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. दरम्यान,मालिकेत सुमन काकू नावाची व्यक्तिरेखा अभिनेत्री श्रद्धा केतकरने साकारली आहे. सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने गंभीर आजाराबद्दल खुलासा केला आहे.
अभिनेत्री श्रद्धा केतकर गेली १७ वर्षांपासून कानासंबधित गंभीर आजाराचा सामना करतेय. 'FM KMW 29'दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने या आजारपणाचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणाली,"मी एक डाव भटाचा नाटक करत होते. ते करत असताना एक दिवस अचानक मला सर्दी झाली. तेव्हा माझ्या कानामध्ये आवाज सुरु झाले. म्हणजे पूर्वीच्या काळी जसे कुकर असायचे त्यांच्या शिट्टीचा जसा आवाज येतो. ती शिट्टी जितकी जोरात वाजते. तसे आवाज माझ्या कानात तेव्हा सुरु झाले. मला वाटलं की हे कदाचित सर्दीमुळे होत असेल. या गोष्टीला जवळपास १७ वर्ष झाली असतील. तेव्हा प्रचंड त्रास झाला. त्याला टिनिटस नावाचं आजार म्हणतात. "
यापुढे अभिनेत्रीने सांगितलं, "त्याचा परिणाम माझ्या ऐकण्याचा क्षमतेवर झाला. तरुण होते तेव्हा ते चालून गेलं म्हणजे मी तेव्हा कामही करत होते. पण,नंतर मला नीट ऐकू यायचं नाही. जर कोणीतरी लांबून हाक मारली तर ते कळायचं नाही. सीन चालू असताना तर दिग्दर्शक काही सूचना देत असतील तर ते मला ऐकू यायचं नाही. असा मग त्याचा परिणाम माझ्या श्रवणशक्तीवर झाला. त्यानंतर एक पॉईंट असा आला की माझा आत्मविश्वासच गेला. यामुळे दुसऱ्याची पण गैरसोय होते. आपल्याला पण अवघडल्यासारखं होतं, असं वाटायला लागलं. त्याच्यामुळे मग मी थांबले. सरस्वतीनंतर हे सगळं वाढतंच गेलं."
उपचार केले पण...
"यावर उपचार केले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कारण, याचं आवाज येण्यामागचं कारण वेगळं आहे. ते कानाच्या हाडांशी संबंधित आहे. आपल्या कानाची हाडे जी कंपन पावतात ती माझ्याबाबतीत होत नाही. शिवाय त्याची सर्जरी करून किती यशस्वी होईल, याची पण गॅरंटी नव्हती. सर्जरी करूनही जे मला आवाज येतात ते बंद होतील, याची सुद्धा शास्वती नव्हती.तेव्हा माझा मुलगाही लहान होता आणि घराला सुद्धा वेळ देणं गरजेचं होते. म्हणून मी ठरवलं की आता थांबूया."