'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने खरेदी केलं स्वप्नातलं घर! फोटो शेअर करत म्हणाली, "घर म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 12:33 PM2024-04-14T12:33:16+5:302024-04-14T12:33:48+5:30

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने घेतलं नवं घर! शेअर केले फोटो

tharla tar mag fame actress ruchira jadhav buys new home shared photos | 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने खरेदी केलं स्वप्नातलं घर! फोटो शेअर करत म्हणाली, "घर म्हणजे..."

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने खरेदी केलं स्वप्नातलं घर! फोटो शेअर करत म्हणाली, "घर म्हणजे..."

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव. या मालिकेने रुचिराला लोकप्रियता मिळवून दिली. अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेल्या रुचिराचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातली अपडेट्स देत असते. रुचिराने नुकतीच एक खूशखबर चाहत्यांना दिली आहे. रुचिराने गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन घर खरेदी केलं आहे. 

रुचिराने तिच्या इन्स्टाग्रामवर घराचे काही फोटो शेअर केले आहेत. स्वप्नपूर्ती झाल्याचं म्हणत रुचिराने पोस्ट शेअर केली आहे. "घर म्हणजे जिथे आनंद आहे! घर म्हणजे जिथं माझी माणसं हसतात! आयुष्यात फार कमी गोष्टी आहेत ज्यामुळे मला आनंद आणि समाधान मिळतं. माझं काम आणि माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू या गोष्टी त्यापैकीच एक आहेत. स्वप्न पूर्ण करण्याच्या माझ्या प्रवासात मला जाणवलं की स्वत:चं घर हे त्यापैकीच एक आहे", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. रुचिराच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. 

रुचिराने तिच्या घराच्या फोटोंबरोबरच कुटुंबीयांबरोबरचे फोटोही शेअर केले आहेत. "ही शेवटची स्टेप नाही...पण, पहिली नक्कीच आहे. प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे," असं म्हणत रुचिराने तिच्या नव्या घराची झलकही दाखवली आहे.

सध्या रुचिरा स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत काम करत आहे. तिने 'बिग बॉस मराठी ४'मध्येही सहभाग घेतला होता. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी रुचिरा एक होती.   

Web Title: tharla tar mag fame actress ruchira jadhav buys new home shared photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.