'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडेने दाखवली बाळाची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:32 IST2025-05-31T13:32:05+5:302025-05-31T13:32:36+5:30
Monica Dabade: अभिनेत्री मोनिका दबडे नुकतीच आई झाली आहे. तिने १५ मार्च रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडेने दाखवली बाळाची झलक
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे नुकतीच आई झाली आहे. तिने १५ मार्च रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ती सध्या मालिकेत दिसत नसली तरी सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर बाळाची झलक दाखवली आहे.
मोनिका दबडेच्या लेकीचा नुकताच थाटामाटात बारसा पार पडला. तिने बाळाचं नाव वृंदा ठेवलंय. ती सध्या मालिकेत काम करत नसली तरी वेळ मिळेल तसा सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देत असते. नुकताच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर बाळाची झलक दाखवली आहे. यात तिने बाळासोबतचा सेल्फी शेअर केला आहे, ज्यात ते दोघे बेडवर झोपलेले दिसत आहेत. मात्र या फोटोत बाळाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही आहे. या पोस्टमध्ये न्यू मॉम असा हॅशटॅग वापरला आहे.
मोनिका दबडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती ठरलं तर मग या मालिकेत अस्मिताची भूमिका साकारत आहे. तसेच ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असून रेसिपीचे व्हिडीओ देखील चर्चेत येत असतात. सध्या ती मदरहूड एन्जॉय करते आहे आणि काही काळासाठी तिने कामातून ब्रेक घेतला आहे.