'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीची फसवणूक; ऑनलाइन कार विकली, पण पूर्ण पैसेच मिळाले नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:09 IST2025-10-10T10:08:30+5:302025-10-10T10:09:06+5:30
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनेही तिची कार विकण्यासाठी ऑनलाइन साइटचा वापर केला. पण, हे करणं तिला महागात पडलं आहे. अभिनेत्रीची कार तर विकली गेली पण तिला त्याचे पूर्ण पैसे मिळाले नाहीत.

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीची फसवणूक; ऑनलाइन कार विकली, पण पूर्ण पैसेच मिळाले नाहीत
सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेक जण बहुतांश गोष्टींसाठी आॉनलाइनचा पसंती देतात. 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनेही तिची कार विकण्यासाठी ऑनलाइन साइटचा वापर केला. पण, हे करणं तिला महागात पडलं आहे. अभिनेत्रीची कार तर विकली गेली पण तिला त्याचे पूर्ण पैसे मिळाले नाहीत. सोशल मीडियावरुन अभिनेत्रीने हा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
'ठरलं तर मग'मधील प्रिया तेंडोलकरसोबत हा प्रकार घडला आहे. प्रियाने Cars24india या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तिची कार विकली होती. पण, तिला पूर्ण पैसे दिले गेले नाहीत. अनेक ईमेल करूनही अद्याप प्रियाला तिच्या कार विक्रीची पूर्ण रक्कम मिळालेली नाही. प्रियाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईमेल केल्याचे स्क्रीनशॉट शेअर आहेत. "मी Cars24india वर माझी कार विकली. ४.३० लाख रुपये मिळतील असं मला सांगण्यात आलं होतं. पण, त्यातले ४.२५ लाख रुपयेच माझ्या हातात आले. उरलेले ५ हजार रुपये मला अद्याप मिळालेले नाहीत", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "हा प्रश्न ५ हजार रुपयांचा नाही. हा ग्राहकांना तुम्ही देत असलेल्या सर्व्हिसचा प्रश्न आहे. Cars24indiaचे रुषाली इंगळे, विनित मिश्रा माझे फोन उचलत नाहीत. किंवा कॉल बॅकही करत नाहीयेत. ही फसवणूक आहे". सध्या प्रिया 'ठरलं तर मग' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.