लग्नाआधी डेटवर घेऊन गेला पण अमित भानुशालीने बिलच भरलं नाही; बायकोने सांगितला मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 17:23 IST2024-03-19T17:22:42+5:302024-03-19T17:23:23+5:30

अमित भानुशाली आणि त्याची पत्नी श्रद्धा भानुशाली यांनी लोकमत फिल्मीच्या लव्ह गेम लोचा या शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत अमितच्या पत्नीने त्यांच्या पहिल्या डेटचा किस्साही सांगितला.

tharal tar mag fame amit bhanushali didnt paid bill on his first date with wife shraddha bhanushali | लग्नाआधी डेटवर घेऊन गेला पण अमित भानुशालीने बिलच भरलं नाही; बायकोने सांगितला मजेशीर किस्सा

लग्नाआधी डेटवर घेऊन गेला पण अमित भानुशालीने बिलच भरलं नाही; बायकोने सांगितला मजेशीर किस्सा

'ठरलं तर मग' या मालिकेत अर्जुन हे पात्र साकारून अभिनेता अमित भानुशाली घराघरात पोहोचला. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या अमितला ठरलं तर मग या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी लोकप्रिय ठरत आहे. दिलखुलास व्यक्तिमत्व असलेला अर्जुन सुभेदार प्रेक्षकांना भावतो आहे. सायलीसाठी नेहमी गिफ्ट आणणाऱ्या अर्जुनने खऱ्या आयुष्यात मात्र पहिल्या डेटच बिलही भरलं नव्हतं. 

अमित भानुशाली आणि त्याची पत्नी श्रद्धा भानुशाली यांनी लोकमत फिल्मीच्या लव्ह गेम लोचा या शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. याबरोबरच अमितच्या पत्नीने त्यांच्या पहिल्या डेटचा किस्साही सांगितला. ती म्हणाली, "आम्ही डेटवर गेलो होतो तेव्हा आमचं खाऊन झाल्यानंतर वेटर बिल घेऊन आला. आम्ही दोघेही असेच बसलो होतो. पाच मिनिटं झाल्यानंतर वेटरने विचारलं की मॅडम पैसे दिले का? त्याला मी नाही असं सांगितलं. आणि माझी पर्स काढायला लागले. अमित पण त्याच्या खिशात हात घालून पॉकीट काढत होता. त्याची पर्सच निघत नव्हती. त्याने मला पर्स निघत नाहीये अडकतेय असं सांगितलं. म्हणून मग मीच पैसे दिले. नंतर मग त्याने मला सांगितलं की मी मुद्दाम पैसे दिले नाहीत. पण, तेव्हापासून नंतर आता मी त्यालाच पैसे द्यायला लावते." 

अमित आणि श्रद्धाची लव्हस्टोरीदेखील अशीच हटके आहे. दोघांची पहिली भेट डोंबिवली स्टेशनवर झाली होती. श्रद्धा लेडीज कपार्टमेंटमध्ये तर अमित जनरल डब्यात चढला होता. श्रद्धाने घरी गेल्यानंतर फेसबुकवर अमितला तुझं काम आवडतं असा मेसेज केला होता. तेव्हा अमित 'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेत काम करत होता. त्यानंतर १५ दिवसांच्या डेटिंगनंतर अमितने श्रद्धाला थेट लग्नाचीच मागणी घातली. आता त्यांना एक मुलगा आहे. 
 

Web Title: tharal tar mag fame amit bhanushali didnt paid bill on his first date with wife shraddha bhanushali