'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने गायलं 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान गाणं, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:50 IST2025-12-28T11:49:44+5:302025-12-28T11:50:14+5:30
'ठरलं तर मग' मधील अभिनेत्याला 'धुरंधर'मधील गाण्याची भुरळ पडली आहे. प्रतिकने 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान हे गाणं त्याच्या आवाजात गायलं आहे.

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने गायलं 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान गाणं, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव
'धुरंधर' या सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. केवळ सिनेमाच नव्हे तर 'धुरंधर'मधील गाण्यांची क्रेझही प्रचंड आहे. 'धुरंधर'मधील सगळीच गाणी हिट ठरली असून या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. या गाण्यांवरील अनेक रील व्हायरल होत असून सेलिब्रिटींनाही व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही.
'ठरलं तर मग' मधील अभिनेत्याला 'धुरंधर'मधील गाण्याची भुरळ पडली आहे. मालिकेत अर्जुनचा भाऊ अश्विनची भूमिका साकारणारा अभिनेता प्रतिक सुरेश सोशल मीडियावर सक्रिय असतो. प्रतिकने 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान हे गाणं त्याच्या आवाजात गायलं आहे. याचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. प्रतिकचा आवाज ऐकून चाहते थक्क झाले आहेत. हे गाणं गाताना त्याने गाण्याला दिलेला थोडासा ट्विस्टही चाहत्यांना आवडला आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
दरम्यान, 'धुरंधर' सिनेमाचं वादळ काही केल्या कमी होत नाहीये. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेला हा सिनेमा २३ दिवस बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. केवळ देशातच नाही तर जगात 'धुरंधर' सिनेमा गाजत असून या चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा गाठला आहे.