"तुझा पर-डे आहे तितकंच बोल...", लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला मालिकेच्या सेटवर मिळालेली 'अशी' वागणूक, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:51 IST2026-02-26T13:50:43+5:302026-02-26T13:51:52+5:30
"सगळ्यात घाणेरडं…", मालिकेच्या सेटवर मराठी अभिनेत्रीला आलेला असा अनुभव, म्हणाली-"मी १-२ महिने…"

"तुझा पर-डे आहे तितकंच बोल...", लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला मालिकेच्या सेटवर मिळालेली 'अशी' वागणूक, म्हणाली...
Marathi Actress Vidisha Mhaskar: अभिनयाच्या चंदेरी दुनियेत काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, मनोरंजन क्षेत्रात काम करताना कलाकारांना चांगल्या-वाईट अनुभवांतून जावं लागतं. अनेकदा वाईट वागणूक, नाहक त्रास सहन करावा लागतो. असाच काहीसा अनुभ मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीला आला होता. ज्याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने खुलासा केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे विदिशा म्हसकर.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अभिनेत्री विदिशा म्हसकर गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. रंगभूमी पासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर मालिकाविश्वात पाऊल ठेवलं. मात्र, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला खूप काही सहन करावं लागलं. अलिकडेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली,"मला अजूनतरी कोणत्याही सहकलाकाराचा वाईट अनुभव आलेला नाही. पण, काही लोक असे आहेत जे गोष्टी मॅनेज करतात. शेड्यूल करतात किंवा प्रोडक्शन सांभाळतात. आपल्या आजुबाजूला शंभर लोकं असतील तर ते त्यातील दहा जण असे असतात जे तुम्हाला त्रास द्यायलाच बसलेले असतात."
त्यानंतर विदिशा म्हणाली,"एक व्यक्ती होती ज्याच्यावर मी खूप विश्वास ठेवला होता. त्या माणसासोबत मी माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगायचे. त्यावेळी मी जवळपास १-२ महिने रात्री २ ते सकाळी ६ अशी शिफ्ट करायचे. या सगळ्याचा परिणाम माझ्या आरोग्यावर झाला. अपुऱ्या झोपेमुळे शूटिंगच्या वेळीच माझे डोळे बंद व्हायचे. त्यामुळे मी त्या माणसाला विनंती केली की मला फक्त १ दिवस लेटचा कॉल टाईम दे... तर त्यावर तो माणूस म्हणाला,'तुझं एवढंच असेल ना तर तू प्रोड्यूसरशी बोल'.अशी उत्तर मला मिळाली. शिवाय त्याचं सगळ्यात घाणेरडं हे वाक्य होतं की, तुझा पर-डे आहे तितकाच बोल."
मग मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "त्या क्षणी मला असं झालं... अरे, ज्या व्यक्तीला आपण एक चांगला मित्र,मैत्रीण म्हणून समजत होतो. त्या व्यक्तीने आपल्याला वेळेत त्याचे रंग दाखवले. खरंतर, यामुळे त्या माणसाचं कोणतं कामही अडणार नव्हतं. फक्त काही नॉर्मल बदल त्यांना करायचे होते. म्हणून जर मला तुझा पर-डे तितकंच बोलं... असं ऐकवलं जात असेल तर... तेव्हा मला जाणीव झाली की लोकांना त्यांच्या लेव्हलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. या लिमिट्स आपण सेट केल्याच पाहिजेत. नाहीतर लोकं तुम्हाला ग्राह्य धरतात." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
वर्कफ्रंट
विदिशा म्हसकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'दहा बाय दहा नाटक' तसेच 'बन मस्का', 'ती फुलराणी' तसेच 'हे मन बावरे', 'रंग माझा वेगळा' यांसारख्या मालिकांमधून तिने काम केलं आहे. सध्या विदिशा 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारते आहे.