"८ वर्षे डिप्रेशनमध्ये होते अन्...", प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला 'तो' कठीण काळ, म्हणाली-"माझी सुटका..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:10 IST2026-01-14T18:09:59+5:302026-01-14T18:10:58+5:30
लग्न,घटस्फोट अन् …; नैराश्याच्या गर्तेत सापडली होती अभिनेत्री, स्वत:ला कसं सावरलं?

"८ वर्षे डिप्रेशनमध्ये होते अन्...", प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला 'तो' कठीण काळ, म्हणाली-"माझी सुटका..."
Tv Celebrity : सर्वसामान्यांसह कलाकारांच्या आयुष्यातही अनेक अनपेक्षित गोष्टी घडत असतात. इथे कधी कोणाच्या वाट्याला यश येतं तर कधी त्याच यशाच्या आनंदावर विरजण पडतं. परंतु, सेलिब्रिटींच्या आयुष्याची गणित फक्त या यश-अपयशावर अवलंबून नसतात अनेकदा त्याच्या आयुष्यात त्यांना चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याचदा या परिस्थितीशी दोन हात करताना याच गोष्टींमुळे त्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडला होता. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने या
त्रासाबद्दल खुलासा केला आहे. ही अभिनेत्री रश्मी देसाई आहे.
रश्मी देसाई ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उतरन,दिल से दिल तक अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. अलिकडेच तिने टाइम्स नाऊला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे. यावेळी ती म्हणाली, "एक वेळ अशी होती जेव्हा मी ८ वर्षे नैराश्यात होती. मी खूप मनावर ओझे घेऊन जगत होते. मला पुन्हा सुरुवात करण्यास अनेक वर्षे लागली. आता मी त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर आली आहे."
मग पुढे रश्मी म्हणाली,"तुमचा कामाचा प्रवास दुसरं कोणीही ठरवत नाही. काम मला शांती देते. आणि ती माझी सुटका देखील होती, जी मला खूप उशिरा समजली. आता मी दोन्ही गोष्टींचा समतोल राखायला शिकते आहे." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला.
वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर रश्मी देसाईने २०१२ मध्ये टीव्ही अभिनेता नंदिश संधूसोबत प्रेमविवाह केला होता, पण हे लग्न काही वर्षांतच तुटले आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.