"२० वर्षांची मुलगी अचानक मेकअप रुममध्ये आली अन्..."; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने सांगितला 'त्या' चाहतीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:24 IST2025-11-26T17:13:49+5:302025-11-26T17:24:46+5:30

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने सांगितला 'त्या' चाहतीचा किस्सा, म्हणाला...

television actor tharla tar mag serial fame chaitanya sardeshpande share incident of famale fan | "२० वर्षांची मुलगी अचानक मेकअप रुममध्ये आली अन्..."; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने सांगितला 'त्या' चाहतीचा किस्सा

"२० वर्षांची मुलगी अचानक मेकअप रुममध्ये आली अन्..."; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने सांगितला 'त्या' चाहतीचा किस्सा

Television : स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा असते.  या मालिकेत दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट पाहायला मिळतायत. या ट्विस्टने प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. त्यामुळेच ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल स्थानावर असते. ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन- सायली नव्हे प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनावर गारुड घातलंय. त्यातीलच एक नाव म्हणजे अर्जुनचा मित्र चैतन्य. सध्या हा अभिनेता एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे.

'ठरलं तर मग' या मालिकेत अर्जुनच्या जवळच्या मित्राची म्हणजेच चैतन्यची भूमिका अभिनेता चैतन्य सरदेशपांडे साकारत आहे. नुकतीच त्याने 'FunBanter' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यादरम्यान अभिनेत्याने  त्याच्या आयुष्यात घडलेला एक मजेशीर किस्से शेअर केले. तो किस्सा सांगताना चैतन्य म्हणाला, "अहमदनगरला एक कांकरिया करंडक नावाची बालनाट्य स्पर्धा व्हायची. आम्ही जवळपास २-३ वर्ष त्या स्पर्धेत सहभागी व्हायचो. पण, त्यावेळी एका नाटकासाठी आम्ही तिकडे गेले होतो. तेव्हा साधारण १२-१३ वर्षाचे असू. अगदीच वयात आलेलो असंही म्हणता येणार नाही."

पुढे अभिनेत्याने म्हटलंय की त्याचं काम पाहून एक चाहती थेट मेकअप रुममध्ये घुसली होती. ," त्यादरम्यान, प्रयोग झाल्यानंतर आम्ही मेकअप रुममध्ये गेलो. तिथे थोडीशी आमच्यापेक्षा मोठी असलेली मुलगी होती. तिचं वय साधारण २० वर्ष असेल. ती मुलगी अचानक मेकअप रुममध्ये आली आणि म्हणाली, किती गोड काम केलंस तू... मग तिने गालावर पप्पी दिली. मेकअप रुममधले सगळेजण माझ्याकडे बघायला लागले. पण, मलाही काय झालं कळतं नव्हतं."असा किस्सा अभिनेत्याने शेअर केला.

Web Title: television actor tharla tar mag serial fame chaitanya sardeshpande share incident of famale fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.