'अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा लॉकडाऊनचा असा करुन घेतेय उपयोग , वाचून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:00 IST2020-04-23T07:00:00+5:302020-04-23T07:00:00+5:30

छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे

Tejshree pradhan reading books during lockdown period gda | 'अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा लॉकडाऊनचा असा करुन घेतेय उपयोग , वाचून तुम्हीही कराल कौतुक

'अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा लॉकडाऊनचा असा करुन घेतेय उपयोग , वाचून तुम्हीही कराल कौतुक

अग्गंबाई सासूबाई’ मालिका हि अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत. या मालिकेतील शुभ्रा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या काय करतेय हे जाणून घायची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. तेजश्री सध्या वाचनात व्यस्त आहे. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या मोठ्या सुट्टीमध्ये ती अवांतर वाचन करतेय. सोशल मीडियापासून लांब राहून तेजश्री हा वेळ स्वतःसाठी देतेय.

 

सोशल मीडियावर वेळ न दवडता तोच वेळ सत्कारणी लावायचं तेजश्रीने ठरवलंय आणि म्हणूनच ती पुस्तकांच्या प्रेमात रमली आहे. पुस्तकांच्या जवळ गेलेली तेजश्री सोशल मीडियापासून सध्या लांब असल्यामुळे तिचे चाहते मात्र तिला मिस करत आहेत.

छोट्या पडद्या असो किंवा रुपेरी पडद्या दोन्ही ठिकाणी तिने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. तेजश्री बबलू बॅचलर या सिनेमात बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. 20 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार होता मात्र लॉकडाऊनमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या सिनेमात तिच्यासोबत शर्मन जोशीसुद्धा दिसणार आहे. 

Web Title: Tejshree pradhan reading books during lockdown period gda